2025च्या इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) चाहत्यांना नक्कीच आतुरता लागली असेल. त्याआधी मेगा लिलाव (IPL Mega Auction) होणार आहे. आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव (24 आणि 25 नोव्हेंबर) रोजी जेद्दाह येथे होणार आहे, सर्व संघ त्यांच्या लिलावाची रणनीती कशी अंमलात आणतील याकडे सर्वांचे लक्ष नक्कीच वेधले गेले असेल.
मेगा लिलावात 574 खेळाडू सहभागी झाले होते आणि 10 फ्रँचायझींनी 204 जागा भरल्या होत्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चे क्रिकेट संचालक मो बोबट यांनी कबूल केले की, लिलावात काहीही निश्चित नाही. त्यामुळे त्यांनी लिलावासाठी अ, ब, क आणि ड अशा योजना तयार केल्या आहेत.
बोबट यांनी शनिवारी आयएएसला (IANS) जारी केलेल्या फ्रँचायझी स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, “जसे तुम्ही लिलावाच्या जवळ जाता, तुम्ही लिलावाबद्दल अधिक विचार करू लागता. सेट ऑर्डर आणि विशिष्ट खेळाडू कुठे ठेवता येतील हे जाणून घेतल्याने तुम्ही कसे नियोजन करता आणि तुमची रणनीती काय आहे यावर मोठा प्रभाव पडतो.”
पुढे बोलताना बोबट म्हणाले की, “तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकांवर आणि वेगवेगळ्या खेळाडूंवर काय खर्च करायचा आहे यासाठी काही खर्चाचे पॅरामीटर्स सेट करणे हा देखील एक अतिशय रोमांचक भाग आहे. तुम्ही शक्य तितक्या शक्य परिस्थितींसाठी स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न करत आहात.”
शेवटी बोलताना बोबट म्हणाले की, “लिलावात काय घडेल किंवा काय होणार याची शाश्वती नाही, परंतु आपल्याकडे कदाचित ए, बी, सी आणि डी योजना आहे.”
आरसीबीने आगामी हंगामासाठी विराट कोहली (Virat Kohli), रजत पाटीदार (Rajat Patidar) आणि यश दयाल (Yash Dayal) यांच्या रूपाने 3 खेळाडूंना कायम ठेवले आहे. आगामी मेगा लिलावात 83 कोटी रुपयांच्या पर्ससह राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू प्रवेश करेल आणि संघात आधीपासून असलेल्या कोणत्याही कॅप्ड खेळाडूंना आणण्यासाठी 3 राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरू शकेल.
महत्त्वाच्या बातम्या-
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी माजी ऑस्ट्रेलिया दिग्गजाचा गौतम गंभीरवर शाब्दिक हल्ला!
चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात येणार! आयसीसीनं जारी केलं वेळापत्रक
भारताचा सर्वात मोठा मॅचविनर परतला! रणजी ट्रॉफीमध्ये बॅट अन् बॉलनं जबरदस्त कामगिरी