---Advertisement---

आयपीएल सुरू होण्याआधी अहमदाबादमध्ये पाऊस, पहिल्या सामन्यावर काय होणार परिणाम?

On: शुक्रवार, मार्च 31, 2023 2:36 PM
Narendra-Modi-Stadium
---Advertisement---

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2023 चा पहिला सामना आयोजित केला गेला आहे. शुक्रवारी (31 मार्च) चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात हा सामना खेळला जाणार आहे. आगामी आयपीएल हंगाम सुरू होण्याआधी उद्घाटन समारंभ आयोजित केला गेला आहे. पण अहमदाबादमघील वातावरण  शुक्रवारी होणाऱ्या अद्घाटन समारंभात बाधा आणू शकते.

अहमदाबादमधील आजचे वातावरण –
कोरोना व्हायरलसच्या कारणास्तव मागचे तीन आयपीएल (IPL) हंगाम अपेक्षेप्रमाणे होऊ शकले नाहीत. तसेच यादरम्यान उद्घाटन समारंभाही आयोजित केला गेला नाही. यावर्षी मात्र बीसीसीआयने आयपीएल भारतात आयोजित केली आणि उद्घाटन समारंभ देखील दिमाखात होणार आहे. पण गुरुवारी (30 मार्च) अहमदाबादमध्ये झालेल्या पावसामुळे चाहते आणि दोन्ही संघांची डोकेदुखी वाढली आहे. असे असले तरी, शुक्रवारी (31 मार्च) मात्र वातावरण साफ आहे आणि उन देखील चांगले पडले आहे. अशात आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यात या पावसामुळे कुठलाच धोका दिसत नाही. त्याचसोबत काही सांस्कृतीक कार्यक्रम देखील आयोजित केले गेले आहेत.

माहितीनुसार आयपीएलच्या 16व्या हंगामातच्या उद्घाटनासाठी तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंदाना डान्स करणार आहेत. तसेच बॉलिवुड सिंगर अरिजीत सिंग देखील लाईव्ह परफॉर्म करणार आहे. चाहत्यांमध्ये या उद्घाटन समारंभासाठी विशेष उत्सुकता दिसत आहे. दरम्यान, गतविजे गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील हा पहिला सामना शुक्रवारी रात्री 7.30 वाजता सुरू होईल.

यावर्षी हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स (Gujarat Titans) पुन्हा एकदा विजेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असेल. गुजरातने त्यांच्या संघातील बहुतांश खेळाडू यावर्षीही कायम ठेवले आहेत. सोबतच केन विलियम्सन, ओडियन स्मिथ आणि केएस भरत या खेळाडूंनाही ताफ्यात जोडले आहे. असे असले तरी पहिल्या सामन्यात गुजरातला त्यांचा फिनिशर डेविड मिलरची कमी जाणवेल. सीएसकेचा विचार केला, तर पुन्हा एकदा चाहते एमएस धोनीला खेळाताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. संघात अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि बेन स्टोक्स यांच्याकडूनही चाहत्यांच्या अपेक्षा जास्त असतील.
(Ahmedabad experienced rain on Thursday and this may affect the match between CSK and Gujarat Titans)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
GTvsCSK । गुजरात-चेन्नईचे महत्वाचे खेळाडू अनुपस्थितीत, ‘अशी’ आहे संभावित प्लेइंग इलेव्हन 
शिवम पटारे व प्रफुल झावरेच्या आक्रमक खेळाने अहमदनगर पेरियार पँथर्सचा विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---