---Advertisement---

असंख्य अडचणींवर मात करत अहमदाबाद फ्रेंचायझी आयपीएलच्या रणसंग्रामासाठी सज्ज

On: मंगळवार, जानेवारी 11, 2022 1:03 AM
ipl-trophy
---Advertisement---

आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये दोन नवीन फ्रेंचायझी सामील होणार आहेत. या फ्रेंचायझी लखनऊ आणि अहमदाबाद शहरांच्या असणार आहेत. बीसीसीआयने (bcci) या दोन नवीन संघांची घोषणा केल्यानंतर अहमदाबाद फ्रेंचायझीविषयी अनेकदा वाद समोर आला होता. अमेरिकेतील कंपनी सीवीसी कॅपिटल्सने अहमदाबाद फ्रेंचायझीचाला विकत घेतले होते आणि यानंतर हा वाद सुरू झाला होता. आता अशा बातम्या समोर आल्या आहेत की, बीसीसीआयने अहमदाबाद फ्रेंचायझीला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.

सीवीसी कॅपिटल्स ही एक अमेरिकी कंपनी आहे आणि त्यांनी मोठी किंमत मोजून अहमदाबाद फ्रेंचायझीची मालकी मिळवली आहे. परंतु, अहमदाबाद फ्रेंचायझीला विकत घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच अनेकांनी कंपनीवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. अश्या बातम्या आल्या होत्या की, सीवीसी कॅपिट्ल ही कंपनी ऑनलाइन सट्टा बाजारातील कंपन्यांशी जोडली गेलेली आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार, सट्टाबाजाराशी संबंध असलेली कोणतीच कंपणी फ्रेंचायझीची मालकी मिळवू शकत नाही. परंतु आता हा वाद मिटला असल्याचे सांगितले जात आहे आणि फ्रेंचायझीला लेटर ऑफ इंटेट देखील दिले गेले आहे.

बीसीसीआयने फ्रेंचायझीला परवानगी दिल्याबद्दल अद्याप कसलीही माहिती दिली नाहीये. मात्र, लवकरच तशी घोषणा केली जाईल. बीसीसीआयने सीवीसीच्या बाबतीत भारताचे सॉलीसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडे माहिती मागितली होती. मेहतांनी या कंपनीविषयी सकारात्मक माहिती दिल्याचे समजते. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त तीन न्यायाधिशांच्या समितीने देखील त्यांना क्लिन चिट दिली आहे.

बीसीसीआयने दोन्ही नवीन फ्रेंचायझींना तीन-तीन खेळाडू रिटेन करण्याची संधी दिली आहे आणि संघ या तीन खेळाडूंची यादी लवकरच जाहीर करतील. यानंतर इतर संघांसोबत हे दोन नवीन संघ मेगा लिलावात इतर खेळाडूंवर बोली लावतील. अशी माहिती मिळाली आहे की, अहमदाबाद फ्रेंचायझी अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि श्रेयर अय्यर यांच्यावर लक्ष ठेवून आहे. तसेच, अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकी गोलंदाज राशिद खानला देखील अहमदाबाद फ्रेंचायझी संघात सामील करू इच्छिते. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशीष नेहरा अहमदाबादचा मुख्य प्रशिक्षक बनू शकतो.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या : आयसीसीने डिसेंबरमध्ये एकाही महिला क्रिकेटपटूला ‘प्लेअर ऑफ दि मंथ’ पुरस्काराने का गौरवले नाही?

जयपुरविरुद्ध दिल्लीने चाखली पहिल्या पराभवाची चव! नवीन २८ सामन्यांनंतर सुपर टेन करण्यात अपयशी

संगमनेरच्या निमगाव पागा येथील रिया श्रीलंकेत दाखवणार जादू! आमदार निलेश लंकेंची मोठी मदत

व्हिडिओ पाहा –

सचिनच्या सल्ल्याने पालटली कारकीर्द पण सचिनमुळेच जगभर ट्रोल झालेला Lord Thakur |  Sachin Tendulkar

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---