भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले आहेत. यातील पहिल्या सामन्यात भारताला 21 धावांनी पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर कमी धावसंख्येच्या दुसऱ्या सामन्यात भारताने दमदार पुनरागमन करत न्यूझीलंडला 6 विकेट्सने पराभूत केले होते. अशात बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी) मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर मालिका जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील.
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील तिसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ प्रत्येकी एक विजय मिळवत मालिकेत 1-1 अशा बरोबरीवर आहेत. आता तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांची नजर विजय मिळवण्यावर असेल. खरं तर, न्यूजीलंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले आहे. रांची आणि लखनऊमध्ये खेळपट्टीवर फिरकीपटूंना खास फायदा मिळाला होता. अशात अहमदाबाद खेळपट्टीवर फिरकीपटू नाही, तर फलंदाजांना मदत मिळण्याची आशा आहे. यामागील कारण म्हणजे, पहिल्यांदा फलंदाजी करणारे संघ आतापर्यंत या मैदानावर 5 सामने जिंकले आहेत. अशात या सामन्याबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेऊया…
तिसऱ्या टी20 सामन्याविषयी सर्वकाही-
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना कधी खेळला जाईल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी) खेळला जाणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना कुठे खेळला जाईल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळला जाईल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना किती वाजता सुरू होईल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. तसेच, उभय संघात 6.30 वाजता नाणेफेक होईल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित होईल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील टी20 मालिकेच्या प्रसारणचे हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. त्यामुळे हे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील सामने स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह इतर अनेक भाषांमध्ये समालोचनासह पाहू शकता.
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा टी20 सामना फोन किंवा लॅपटॉपवर लाईव्ह कसा पाहता येईल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसऱ्या टी20 सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग भारतात हॉटस्टार ऍपवर पाहता येईल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना मोफत कसा पाहता येईल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसऱ्या टी20 सामन्याचे लाईव्ह प्रसारण डीडी फ्री डिशवर डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर पाहू शकता. यासाठी कोणतेही शुल्क मोजण्याची गरज नाही. (ahmedabad narendra modi stadium live streaming and live telecast know here all about ind vs nz 3rd t20i)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चंडिका हाथुरुसिंघा पुन्हा बनले बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक, ‘या’ तारखेला स्वीकारणार कार्यभार
देश नव्हे पैसा हवा! इंग्लंडच्या सलामीवीराने पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी सोडला संघ