बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियन संघाने सलामीवीर उस्मान ख्वाजा व अष्टपैलू कॅमेरून ग्रीन यांच्या शतकांच्या जोरावर पहिला डावात 480 धावांचा डोंगर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाखेर बिनबाद 36 अशी मजल मारली आहे.
Ashwin takes six as Australia are finally bowled out.#WTC23 | #INDvAUS | 📝 https://t.co/VJoLfVSeIF pic.twitter.com/JAyJ15GG8o
— ICC (@ICC) March 10, 2023
पहिल्या दिवसाच्या 4 बाद 255 या धावसंख्येवरून पुढे सुरुवात करताना उस्मान ख्वाजा व कॅमेरून ग्रीन यांनी सुरुवातीला सांभाळून खेळ केला. मात्र, त्यानंतर त्यांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. पहिल्या सत्रात एकही भारतीय गोलंदाज बळी मिळवू शकला नाही. यादरम्यान ख्वाजाने आपले दीडशतक पूर्ण केले. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच षटकात ग्रीनने आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक साजरे केले. तो 114 धावांची खेळी करून माघारी परतला. त्यानंतर आलेले केरी व स्टार्क फारसे योगदान देऊ शकले नाहीत. त्यानंतर ख्वाजा 180 धावांची खेळी करून बाद झाला. मात्र, टॉड मर्फी व नॅथन लायनने नवव्या गड्यासाठी 70 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला 480 पर्यंत पोहोचवले. भारतीय संघासाठी रविचंद्र नअश्विन याने 6 बळी टिपले.
दुसऱ्या दिवसातील उर्वरित षटके खेळण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरल्यानंतर रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी कोणतीही जोखीम न पत्करता भारतीय संघाचा डाव पुढे नेला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने 10 षटकात 36 धावा केल्या होत्या. रोहित 17 तर गिल 18 धावांवर नाबाद आहे.
(Ahmedabad Test Day 2 Khawaja And Green Hits Century Australia Post 480 And Ashwin Took 6 Wickets)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संतापजनक! धावांचा डोंगर उभा राहताच कर्णधार रोहित हादरला, पाणी घेऊन आलेल्या सहकाऱ्यावर मोक्कार चिडला
टीम इंडियाच्या गोलंदाजीची पिसे काढत ऑस्ट्रेलियाच्या कॅमरुन ग्रीनने बनवला मोठा रेकॉर्ड, स्वप्नही झाले पूर्ण