आजच्या दिवसाची शेवटची लढत अहमदनगर पेरियार पँथर्स व सांगली सिंध सोनिक्स यांच्यात झाली. सांगलीच्या तुषार खडके व वृषभ साळुंखे यांनी चतुरस्त्र चढाया करत आक्रमक सुरुवात करत अहमदनगर संघावर लोन पडला. अहमदनगर संघाकडून मात्र शिवम पटारे आपली जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडत होता. त्याने चपाल चढाया करत जोरदार प्रदर्शन चालूच ठेवले.
मध्यंतरापूर्वीच शिवम पटारे ने आपला स्पर्धेतील सलग पाचवा सुपर टेन पूर्ण केला. शिवम पटारेच्या आक्रमकते पुढे सांगली संघ मध्यंतरापूर्वीच दोन वेळा ऑल आऊट झाला. 33-16 अशी भक्कम आघाडी मिळवत अहमदनगर संघा पाचव्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता.
शिवम पटारे ने क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीजच्या एक सामन्यात चढाईत सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम केला. त्याने चढाईत 26 गुण मिळवत संघाला 61-32 असा विजय मिळवून दिला. तर अहमदनगर पेरियार पँथर्स संघाच्या बचावपटूंनी चांगला प्रदर्शन केला. अजित पवार ने 5 तर संभाजी वाबळे ने 6 पकडीत गुण मिळवले. सांगलीच्या वृषभ साळुंखे ने 12 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- शिवम पटारे, अहमदनगर पेरियार पँथर्स
बेस्ट डिफेंडर- संभाजी वाबळे, अहमदनगर पेरियार पँथर्स
कबड्डी का कमाल- शिवम पटारे, अहमदनगर पेरियार पँथर्स