सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार ऍडेम मार्करम मंगळवारी (18 एप्रिल) मैदानात जबरदस्त चपळाई दाखवत होता. मुंबई इंडियन्सविरुद्ध होम ग्राउंडवर खेळणाऱ्या हैदराबाद संघाला 14 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. हैदराबादाने हा सामना जरी गमावला असला, तरी त्यांचा कर्णधार मार्करम मात्र चांगलाच चर्चेत राहिला. मार्करमने मुंबईच्या तीन महत्वाच्या फलंदाजांचे झेल घेतले. यापैकी दोन झेल खरोखर कौतुकास पात्र म्हणता येतील.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हैदराबादविरुद्धच्या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. रोहितने संघाला चांगली सुरुवात दिली. पण पाचव्या षटकात गोलंदाजीला आलेल्या टी नटराजन याने त्याला ऍडेन मार्करम (Aiden Markram) याच्या हातून झेलबाद केले. रोहित शर्माच्या साधीने मुंबईच्या डावाची सुरुवात करण्यासाठी ईशान किशन (Ishan Kishan) खेळपट्टीवर आला होता. संघाची धावसंख्या 41 अशताना रोहितच्या रूपात मुंबईला पहिला धक्का बसला. तर संघाची धावसंख्या 87 झाल्यानंतर ईशान किशन याच्या रूपात मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का बसला.
मुंबईच्या डावातील 12 वे षटक टाकण्यासाठी वेगवान गोलंदाज मार्को जेनसन (Marco Jansen) आला. षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने ईशान किशन याला मार्करमच्या हातात झेलबाद केले. त्यानंतर षटकातील याच षटकातील पाचव्या चेंडूवर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) देखील मार्करमच्याच हातात झेलबाद झाला. ईशान आणि सूर्यकुमारचा झेल ज्या पद्धतीने मार्करमने झेळला, तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजन मार्करमची तुलना दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज जॉन्टी रोड्स यांच्याशी करत आहेत.
Did You Watch – Two stupendous catches by the #SRH Skipper @AidzMarkram ends Ishan Kishan and Suryakumar Yadav's stay out there in the middle.#SRHvMI pic.twitter.com/a1sGNjV6r1
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2023
दरम्यान, मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सला वेगवान सुरूवात दिल्याचा फायदा संघातील इतर फलंदाजांनी घेतला. मुंबईने कॅमरून ग्रीन (64) याच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात 5 बाद 192 धावा साकारल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबाद संघ 19.5 षटकात 178 धावा करून सर्वबाद झाला. सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याच्यासाठी हा आयपीएल कारकिर्दीतील दुसरा सामना असून त्याने भुवनेश्वर कुमार याच्या रूपात पहिली विकेट मिळवली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! माजी रणजीपटूचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, पत्नीचा जागीच मृत्यू
अर्जुनच्या कामगिरीची प्रीती झिंटालाही भुरळ; ट्वीट करत म्हणाली, ‘नेपोटिझममुळे खिल्ली उडवली गेली, पण…’