---Advertisement---

श्रेयसला पुढील कसोटी कर्णधार करण्यासाठी भारतीय दिग्गज आग्रही; म्हणाला, “सध्यातरी तोच…”

Shreyas-Iyer
---Advertisement---

सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार या मुद्द्यावर अनेकदा चर्चा होताना दिसते. टी20 विश्वचषकात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागल्यानंतर टी20 संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या याच्याकडे दिले जाण्याची‌ शक्यता आहे. तसेच, पुढील एका वर्षात भारतीय संघाच्या वनडे व कसोटी कर्णधार पदाबद्दलही निर्णय घेतला जाऊ शकतो. विद्यमान भारतीय कर्णधार रोहित शर्मा हा 35 वर्षांचा असल्याने पुढील एक ते दीड वर्षात भारताला नवा नियमित कर्णधार मिळण्याची शक्यता आहे. त्याबाबत आत्ताच अनेक माजी क्रिकेटपटूंनी आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

भारतीय संघाचे सात आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व केलेल्या अजय जडेजा यांनी नुकतेच एका मुलाखतीत भारताचा पुढील कसोटी कर्णधार कोण असावा? याबाबत आपले मत व्यक्त केले. जडेजा यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले,

“दोन वर्षांपूर्वी अनेक जण श्रेयस अय्यर याला कर्णधारपदाचा दावेदार मानत होते. सध्या पुढील कर्णधार म्हणून अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मला विचाराल तर श्रेयस अय्यर त्यासाठी एक परिपूर्ण व्यक्ती वाटतो. सध्या तो ज्याप्रकारे खेळत आहे, तसाच खेळ त्याने कायम राखला तर पुढील कसोटी कर्णधार म्हणून तो नक्कीच आपली योग्यता सिद्ध करेल.”

अय्यर याच्यासाठी 2022 वर्ष चांगले गेले. 2022 मध्ये 1609 धावांसह तो सर्वाधिक धावा काढणारा भारतीय फलंदाज बनला. त्याने या वर्षात 5 कसोटी सामने खेळताना 60.28 च्या सरासरीने 422 धावा केल्या. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश होता.‌ यात त्याने 92 धावांची सर्वोच्च खेळी केली. भारताचा पुढील कसोटी कर्णधार म्हणून रिषभ पंत व केएल राहुल यांच्या नावाची चर्चा होते. तसेच, इंग्लंड दौऱ्यावरील एकमेव कसोटीत जसप्रीत बुमराह याने देखील भारतीय संघाचे नेतृत्व केलेले.

(Ajay Jadeja Want Shreyas Iyer As India Next Test Captain)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केनने दिला पाकिस्तानला पेन! 722 दिवसांनी शतक ठोकत न्यूझीलंडला मिळवून दिली आघाडी 

आयसीसी महिला एमर्जिंग खेळाडू पुरस्कारासाठी टीम इंडियाच्या दोन ‘धाकड गर्ल’ नामांकित; अशी होती कामगिरी 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---