---Advertisement---

आयपीएल २०२१ आधी दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात सामील झाला दिग्गज खेळाडू; सांभाळणार ‘ही’ भूमीका

---Advertisement---

आयपीएल 2021 ची सर्वत्र जोरदर तयारी सुरू आहे. सर्व संघ आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. परंतु यामध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी अडचण अशी आहे की, संघाचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएलच्या 14 व्या सत्रातील पहिल्या काही सामन्यांमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे संघाचा नवा कर्णधार कोण असेल, याचा निर्णय एक-दोन दिवसांत होणार आहे.

यादरम्यान, दिल्ली संघाने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज अजय रात्रा हे दिल्ली कॅपिटल्स संघाचे नविन सहाय्यक प्रशिक्षक बनले आहेत. रविवारी(28 मार्च) दिल्ली कॅपिटलने याची घोषणा केली.

नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी विजय हजारे ट्रॉफीमध्ये 39 वर्षीय अजय रात्रा आसाम संघाचे प्रशिक्षक होते. यापूर्वी ते पंजाबचे प्रशिक्षकही होते. त्याचबरोबर त्यांनी भारतीय महिला संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. पण यंदा ते प्रथमच आयपीएल संघाशी जोडले गेले आहेत.

साल 2002 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी ते कसोटी शतक ठोकणारे सर्वात युवा यष्टीरक्षक ठरले होते. त्यांनी भारतासाठी 12 एकदिवसीय सामने आणि 6 कसोटी सामने खेळले आहेत.

दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील होण्याबाबत अजय रात्रा म्हणाले आहेत की, सहाय्यक प्रशिक्षक म्हणून दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये सामील होणे माझ्यासाठी सन्मान जनक गोष्ट आहे. संघातील प्रतिभाशाली खेळाडूंसोबत काम करण्यास मी खूप उत्सुक आहे. त्यांच्या यशामध्ये योगदान देण्यासाठी मी आता प्रतीक्षा करू शकत नाही. मला ही संधी दिल्याबद्दल दिल्ली कॅपिटल्सच्या व्यवस्थापकांचे मी आभार मानतो.

दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल 2020 ची अंतिम फेरी गाठली होती. परंतु, अंतिम सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम संघांपैकी एक मुंबई इंडियन्सने त्यांना पराभूत केले होते. त्यामध्ये संघाचे पहिले आयपीएल जिंकण्याचे स्वप्न भंगले. जरी संघाने गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली असली तरी मात्र संघ अद्याप आयपीएल ट्रॉफीपासून दूर आहे.

दिल्ली संघाचा मुख्य प्रशिक्षक ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आहे. तसेच यंदा स्टीव्ह स्मिथह दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खेळताना दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताविरुद्धची ९५ धावांची झुंज अपयशी ठरली, पण सॅम करनच्या नावावर झाला ‘मोठा’ विश्वविक्रम

‘ही’ गोष्ट घडली म्हणून जोफ्रा आर्चरने आयपीएलमधून घेतली माघार; वाचा काय आहे कारण

आयपीएल स्पर्धेनंतर ‘या’ देशामध्येही एबी डिविलियर्सची पाहायला मिळणार चौफेर फटकेबाजी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---