चेन्नई | प्रो कबड्डीत आज दुसरा सामना तमिल थलाईवाज विरुद्ध बेंगलुरु बुल्स संघात होत आहे. हा या हंगामातील एकूण ८वा तर थलाईवाजचा ४था सामना असेल.
चेन्नई लेगमध्ये गतविजेत्या पटना पायरेट्सबरोबर पहिला सामना जिंकल्यावर दुसऱ्या सामन्यात युपी योद्धाज तर तिसऱ्या सामन्यात तेलुगु टायटन्सकडून थलाईवाजचा पराभव झाला.
तरीही या तीन सामन्यात कर्णधार अजय ठाकूरने चांगली कामगिरी केली. या तीन सामन्यात १०.१च्या सरासरीने त्याने ३४ गुण घेत एकूण गुण घेणाऱ्या खेळाडूंमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
यामुळे आज होणाऱ्या सामन्यात अजयला एक खास पराक्रम करण्याची संधा आहे. या सामन्यात जर त्याने १७ गुण घेतले तर प्रो कबड्डीत ६०० गुण घेणारा तो केवळ तिसरा खेळाडू ठरणार आहे.
अजयने आजपर्यंत ८३ सामन्यात ७.०२च्या सरासरीने ५८३ गुण कमावले आहेत. त्यातील ५६३ गुण रेडिंगमधून तर २० गुण डिफेंन्समधून घेतले आहे.
यापुर्वी केवळ राहुल चौधरी (७१९) आणि परदिप नरवाल (६४३) यांनी ६००पेक्षा जास्त गुण घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या-
- क्रिकेटप्रेमी मुंबईकरांना मोठा धक्का! वानखेडेवरील मॅच संदर्भात होऊ शकतो मोठा निर्णय
- ५ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी सचिनने केली होती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
- धोनीच्या या निर्णयाने खलील अहमद झाला निशब्द