भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (३ डिसेंबर) सुरू झाला. या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३२५ धावा केल्या. भारतीय सलामीवीर मयंक अगरवालने या डावात शतकी खेळी पूर्ण केली, तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने सर्व १० विकेट्स घेत जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन केले. एजाज पटेलने या सामन्यात स्वत:च्या नावावर एका खास विक्रमाची नोंद केली.
एजाज सध्या ३३ वर्षाचा असून, तो भारतात खेळल्या गेलेल्या एका कसोटी सामन्यात एका डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा दुसरा सर्वाधिक वयस्कर विदेशी डावखूरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. त्याने शनिवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाला ५ व्या विकेटच्या रुपात बाद केले, तेव्हा त्याने या विक्रमाला गवसणी घातली. शनिवारी त्याचे वय ३३ वर्षे ४३ दिवस होते.
भारतात कसोटी खेळताना पाच विकेट्स घेणाऱ्या डावखुऱ्या आणि सर्वात जास्त वयस्कर विदेशी फिरकी गोलंदाजांचा विचार केला, तर यामध्ये पाकिस्तानच्या ईक्बाल कासिम पहिल्या नंबर येतो. ईक्बाल कासिम यांनी जेव्हा भारतात कसोटी खेळताना पाच विकेट्स घेतले, तेव्हा ते ३३ वर्ष आणि २१९ दिवस होते. आता न्यूझीलंडचा एजाज पटेल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
या यादीत तिसरा क्रमांकावर इंग्लंडचे माजी खेळाडू ग्रॅहम लॉक आहेत. ते ३२ वर्ष आणि १८९ दिवसांचे असताना त्यांनी भारतात खेळलेल्या कसोटी सामन्यात पाच विकेट्स घेतल्या होत्या.
दरम्यान, भारताने न्यूझलंडविरुद्धच्या या सामन्यात पहिल्या डावात ३२५ धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. न्यूझीलंडच्या एजाज पटेलने या सामन्यात इतिहास रचला. त्याने सामन्याच्या पहिल्या डावात भारताच्या १० विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त न्यूझीलंडचा एकही गोलंदाज विकेट घेऊ शकला नाही. एजाज पटेल कसोटी सामन्याच्या एका डावात १० विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांमध्ये जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
२१ व्या शतकातील पहिला ‘परफेक्ट टेन’ घेणारा देबाशिष मोहंती विस्मृतीत गेलाय