---Advertisement---

रहाणे-पुजाराची आंतरराष्ट्रीय कारकीर्द समाप्त? दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघात जागा बनवण्यात अपयशी

On: गुरूवार, नोव्हेंबर 30, 2023 8:52 PM
ajinkya-pujara
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वरिष्ठ भारतीय निवड समितीने गुरुवारी (30 नोव्हेंबर) तीनही प्रकारच्या संघांची घोषणा केली गेली आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल केले गेले. या संघाचे नेतृत्व देखील रोहित शर्मा करेल. अनुभवी चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांना या संघात जागा मिळाली नाही.

या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात अनेक युवा फलंदाज दिसत आहेत. रोहित शर्मा विराट कोहली श्रेयस अय्यर व केएल राहुल हे अनुभवी फलंदाज संघाचा भाग असून, यशस्वी जयस्वाल ,शुबमन गिल व ऋतुराज गायकवाड यांना देखील संधी देण्यात आली आहे.

असे असले तरी, जून महिन्यात झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघाचा उपकर्णधार असलेला अजिंक्य रहाणे संघात जागा बनवण्यात अपयशी ठरला. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात त्याने संघात पुनरागमन केले होते. वेस्ट इंडीज दौऱ्यावर दोन डावात त्याला केवळ 11 धावा करता आलेल्या. तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात अपयशी ठरलेला चेतेश्वर पुजारा यावेळी देखील संघात आपली जागा बनवू शकला नाही. त्यामुळे या दोघांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळपास समाप्त झाल्याचे बोलले जातेय.

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार व शार्दुल ठाकूर.

(Ajinkya Rahane And Cheteshwar Pujara Has No Place In Test Sqaud There International Career Might Be Ended)

महत्वाच्या बातम्या – 
‘आता परिणाम भोगा…’, 24 वर्षीय गिलच्या हाती कर्णधारपदाची सूत्रे देताच डिविलियर्सची गुजरातला चेतावणी
टी20 वर्ल्डकपसाठीचे 20 संघ फायनल! यांना मिळाले तिकिट, तर यांचा झाला हिरमोड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---