भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या कुटुंबासमवेत तसेच सहकाऱ्यांबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. नुकताच तो नाशिक आणि संगमनेरला ट्रिपला जाऊन आला. यादरम्यानचे फोटो त्याने मध्यंतरी सोशल मीडियावर शेअर केले होते.
तसेच नुकताच त्याने एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये त्याने नाशिक आणि संगमनेरच्या ट्रिपबदद्ल सांगताना चाहत्यांना महाराष्ट्रातील पर्यटण ठिकाणांबद्दल प्रश्नही विचारला आहे.
तो त्याच्या ट्रिपबद्दल म्हणाला, ‘सध्या मी नाशिकला, संगमनेरला जाऊन आलो. संगमनेरला माझी आजी असते. आपल्या महाराष्ट्रात एवढ्या सुंदर जागा आहेत, ठिकाणं आहेत. त्यामुळे मी तुम्हाला विचारु इच्छितो की तूम्ही मला काही जागा सुचवू शकता का? महाराष्ट्रात मी फिरायला कुठे जाऊ शकतो. तूम्ही मला अशी ठिकाणे सांगा, तिकडे जायला मला नक्की आवडेल.’
हा व्हिडिओ शेअर करताना रहाणेने ट्विट केले आहे की ‘तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला विचारलं की आपल्या महाराष्ट्रात कुठे फिरला आहेस, म्हणून मला माझ्या संगमनेर आणि नाशिकच्या ट्रीपबद्दल सांगायचं होतं. महाराष्ट्रात अशी बरीच सुंदर ठिकाणं आहेत. तुमच्याकडून त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला मला नक्की आवडेल.’
तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला विचारलं की आपल्या महाराष्ट्रात कुठे फिरला आहेस, म्हणून मला माझ्या संगमनेर आणि नाशिकच्या ट्रीपबद्दल सांगायचं होतं. महाराष्ट्रात अशी बरीच सुंदर ठिकाणं आहेत. तुमच्याकडून त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. #MaharashtraTourism @AUThackeray pic.twitter.com/cUWC7Af67j
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) January 30, 2020
रहाणेच्या या ट्विटवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहे. अनेक चाहत्यांनी त्याला महाराष्ट्रातील पर्यटणाचे विविध पर्याय सुचवले आहेत.
महाराष्ट्रातील आवर्जून पहावी अशी वारसास्थळे (Must See Monuments)
१. अजिंठा लेणी(औरंगाबाद)
२. वेरुळ ले.(औ)
३. औरंगाबाद ले.(औ)
४. दौलताबाद किल्ला(औ)
५. बीबी का मकबरा(औ)
६.सीएसएमटी(मुंबई)
७.एलिफंटा गुहा(मुं)
८.लोणार(बुलढाणा)
९.गवळीघर किल्ला
१०.पांडू लेणी माहूर#म #मराठी @MahaDGIPR— Sharad Bodage (@SharadBodage) January 30, 2020
नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य
ता निफाड जि नाशिक…
थंडीच्या दिवसांत तर पर्वणीच असते जमलं तर नक्की भेट दे @ajinkyarahane88 pic.twitter.com/ybxUEXCp0b— Swarup Rahane (@swaruprahane88) January 30, 2020
निघोज येथील जगप्रसिद्ध रांजणखळगे
ता-पारनेर#MaharashtraTourism pic.twitter.com/cR232HLaja— Shivam (@im_not_bhakt) January 30, 2020
रहाणे हा मागील अनेक महिन्यांपासून भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघापासून दूर आहे. पण कसोटी संघाचा मात्र तो नियमित सदस्य आहे. त्यामुळे त्याची फेब्रुवारीमध्ये सुरु होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताच्या संघातील निवड जवळ जवळ पक्की आहे.
जगात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम करण्याची मुंबईकर खेळाडूला होती संधी, पण…
वाचा👉https://t.co/h1Axo8KwlO👈#म #मराठी #Cricket #RanjiTrophy #HPvMUM— Maha Sports (@Maha_Sports) January 30, 2020
सामना जिंकूनही विराट कोहलीला या खेळाडूबद्दल वाटले वाईट
वाचा👉https://t.co/9Vc8ezOlQQ👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND #SuperOver @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 30, 2020