---Advertisement---

कसोटी क्रिकेटमध्ये विराट ऐवजी ‘हा’ खेळाडू आहे सरस कर्णधार, बदलू शकतो भारतीय संघाचे नशीब

On: सोमवार, जून 28, 2021 3:48 PM
Virat-Kohli-and-Ajinkya-Rahane
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मोठ-मोठ्या मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच विराटच्या नेतृत्वात भारतीय कसोटी संघ गेल्या ५ वर्षांपासून अव्वल क्रमांकावर आहे. परंतु, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर त्याच्या नेतृत्वावर टीका केली जाऊ लागली आहे. तसेच अनेकांनी त्याला कर्णधार पदावरून काढून टाका असे देखील म्हटले आहे. भारतीय संघात असा एक खेळाडू आहे जो, विराट कोहली ऐवजी कर्णधारपदाची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडू शकतो.

कोहलीला कर्णधार पदावरून काढून टाकण्याच्या मागणीला जोर

विराट कोहली या दशकातील सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक आहे. परंतु विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकही आयसीसीची ट्रॉफी जिंकली नाही. तसेच इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत देखील विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला एकही जेतेपद जिंकून देता आले नाही.

कोहलीऐवजी हा खेळाडू आहे कर्णधार पदासाठी प्रबळ दावेदार

कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, अजिंक्य रहाणे हा विराट कोहलीपेक्षा सरस कर्णधार ठरू शकतो. २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यानंतर विराट कोहलीला पालकत्व रजा मंजूर झाल्याने तो मायदेशी परतला होता.

त्यानंतर उर्वरित सामन्यांमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद अजिंक्य राहणेला देण्यात आले होते. रहाणेने दुसरा कसोटी सामना जिंकून जोरदार पुनरागमन करून दिले, तसेच कसोटी मालिकेत २-१ ने विजय देखील मिळवून दिला होता. अजिंक्य रहाणे सध्या भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आहे.

परदेशात अजिंक्य रहाणेची विराटपेक्षा सरस कामगिरी

अजिंक्य राहणेची कामगिरी ही परदेशात विराटपेक्षाही सरस आहे. फलंदाजीसह त्याच्यात नेतृत्वाचे गुणही आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्याने भारतीय संघासाठी अनेक सामना जिंकून देणाऱ्या खेळ्या खेळल्या आहेत. त्याने जास्तीत जास्त विक्रम हे दक्षिण आफ्रिका,ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सारख्या देशांमध्ये केले आहेत. (Ajinkya Rahane can replace Virat Kohli as a test team captain of Indian team)

कर्णधार म्हणूनही अजिंक्य रहाणे पुढे….

विराट कोहलीने भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून,त्याने ६१ कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये भारतीय संघाने ३६ सामन्यात विजय मिळवला आहे. तर १५ कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यापैकी १० सामने अनिर्णीत राहिले आहेत.

तसेच अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ५ कसोटी सामने खेळले आहेत. यात भारतीय संघाला ४ कसोटी सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर १ सामना अनिर्णीत राहिला होता. मुख्य गोष्ट म्हणजे, रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकदाही पराभूत झाला नाही.

महत्वाच्या बातम्या – 

ठरलं एकदाचे, टी २० विश्वचषक युएईत होणार! बीसीसीआय अध्यक्षांनी दिला दुजोरा

अर्धशतकानंतर ‘अशाप्रकारे’ मिताली राजला बाद होताना पाहून क्रिकेटप्रेमीही आश्चर्यचकित, व्हिडिओ व्हायरल

सतत फ्लॉप ठरत असलेल्या पुजाराच्या मदतीला धावून आले माजी भारतीय कर्णधार; म्हणाले, ‘जर फक्त त्याच्यावर बोट उचलत असाल तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---