दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यातील ३ सामन्यांची कसोटी मालिका (3 Matches Test Series) सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. २६ डिसेंबरपासून सेंच्यूरियन येथे उभय संघातील पहिल्या कसोटी सामन्याने कसोटी मालिकेचा श्रीगणेशा होणार आहे. आतापर्यंत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात जोरदार सराव करतो आहे.
पाहुणा म्हणून गेलेल्या भारतीय संघासाठी सर्वात चिंतेची बाब आहे, त्यांचे लयीत नसलेले अनुभवी फलंदाज. त्यातही दक्षिण आफ्रिकेच्या मैदानांवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळत असल्याने त्यांच्यासाठी हे आव्हान अजूनच कठीण बनू शकते. त्यामुळे भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Head Coach Rahul Dravid) यांनी या दिग्गजांना पुन्हा जुन्या रंगात आणण्यासाठी कंबर कसली आहे. यावेळी त्यांनी मातब्बर वेगवान गोलंदाज दिपक चाहर (Deepak Chahar) याची मदत घेतली आहे.
वर्ष २०२० पासून लयीत नसलेले कसोटीपटू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्यावर प्रशिक्षक द्रविड विशेष लक्ष देत आहेत. या तिन्ही फलंदाजांचा चांगला सराव करून घेण्यासाठी त्यांनी स्विंग गोलंदाजाचा मारा करणाऱ्या दिपकला गोलंदाजीसाठी वापरले आहे. मंगळवारी (२१ डिसेंबर) स्वत दिपकने सराव सत्रातील व्हिडिओ शेअर केला आहे.
https://www.instagram.com/tv/CXvE76GoD-f/?utm_source=ig_web_button_share_sheet
दिपक चाहरच्या भेदक गोलंदाजीवर करून घेतला सराव
गेल्या बऱ्याच काळापासून रहाणे आणि पुजारा स्विंग गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसले आहेत. त्यामुळे द्रविड यांनी त्यांच्याविरुद्ध स्विंग गोलंदाजी करणाऱ्या दिपकचा वापर केला आहे. आयपीएलमधील एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जच्या या शिलेदाराने आपल्या स्विंग गोलंदाजीच्या जोरावर संघाला अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. त्याची हीच भेदकता सराव सत्रातही (Batting Practice Against Swing) पाहायला मिळाली. त्याने पुजारा आणि रहाणेसारख्या फलंदाजांनी आपल्या स्विंग गोलंदाजीवर चांगलीच परिक्षा घेतली आहे.
द्रविड यांच्या शरणात गेलाय विराट
दुसरीकडे रनमशीन म्हणून ओळखला जाणारा कोहलीही सध्या लयीत नाहीये. गेल्या २ वर्षांपासून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक केलेले नाही. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेत आपल्या शतकाचा दुष्काळ संपवण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्या अनुषंगाने तो द्रविड यांच्यासोबत नेट्समध्ये बराच वेळ घालवताना दिसतो आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय क्रिकेटमध्ये फुटले वादांचे पेव: आता अश्विन-शास्त्री आमने-सामने; वाचा पूर्ण प्रकरण
विनोद कांबळीने निवडले फॅब फोर; विराट वगळता सर्वच नावे चकित करणारी