---Advertisement---

केपटाऊन कसोटीतही रहाणेचा फ्लॉप शो सुरूच! रबाडाच्या चेंडूवर असा झाला बाद, पाहा व्हिडिओ

On: गुरूवार, जानेवारी 13, 2022 5:35 PM
Ajinkya Rahane
---Advertisement---

केपटाऊनच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ११३ धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता. ही मालिका सध्या १- १ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, तिसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (१३ जानेवारी) भारतीय संघ अडचणीत असताना अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु, तो स्वस्तात माघारी परतला आहे.

तर झाले असे की, भारतीय संघाची दुसऱ्या डावातील फलंदाजी सुरू होती. त्यावेळी अजिंक्य रहाणे फलंदाजी करत असताना १९ वे षटक टाकण्यासाठी कागिसो रबाडा (Kagiso Rabada) गोलंदाजीला आला होता. या षटकातील शेवटचा चेंडू टप्पा पडून बाहेरच्या दिशेने निघाला. ज्यावर अजिंक्य रहाणेने रक्षात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा प्रयत्न फसला. (Ajinkya Rahane wicket)

यष्टिरक्षकाने झेल टिपल्यानंतर पंचांकडे जोरदार मागणी केली. परंतु, पंचांनी ती मागणी फेटाळून लावली. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने क्षण ही न दवडता डीआरएस घेण्याची मागणी केली. स्निको मीटरमध्ये स्पष्टपणे दिसून येत होते की, चेंडू ग्लव्हजला लागून यष्टिरक्षकाच्या हातात गेला. त्यानंतर पंचांनी आपला निर्णय बदलून त्याला बाद घोषित केले.

https://twitter.com/vaibhav_hatwal2/status/1481564980889604096

https://twitter.com/cric_zoom/status/1481556542197743617

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघ तिसऱ्या दिवशी (१३ जानेवारी) फलंदाजीला आला, त्यावेळी भारतीय संघाकडे ७० धावांची आघाडी होती. विराट ९ तर चेतेश्वर पुजारा १४ धावांवर नाबाद होता. अनेकांना वाटले होते की, पुजारा मोठी खेळी करेल, परंतु तो एकही अतिरिक्त धाव न करता ९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणेने देखील १ धाव करत पॅव्हेलियनची वाट धरली.

तत्पूर्वी, भारताचा पहिला डाव २२३ धावांवर संपुष्टात आला होता. तर दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात २१० धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे भारताला १३ धावांची आघाडी मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या :

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज म्हणतोय, अश्विन-विराट सर्वात्तम भारतीय क्रिकेटर, ३ सर्वोत्तम गोलंदाजही यादीत

बापरे! रस्त्यावर चणे विकतोय पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज, पाहा व्हिडिओ

हे नक्की पाहा:

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---