रविवारी(११ ऑक्टोबर) आयपीएल २०२० मध्ये २७ वा सामना अबूधाबी येथे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी दिल्लीने अजिंक्य रहाणेला अंतिम ११ जणांच्या संघात संधी दिली आहे.
दिल्लीने रहाणेला रिषभ पंत ऐवजी संघात संधी दिली आहे. पंत मागील सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. तर शिमरॉन हेटमायर ऐवजी यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरेला अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळाली आहे, असे दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेकीवेळी सांगितले.
रहाणे आणि कॅरेचा हा यंदाच्या आयपीएल हंगामातील पहिलाच सामना आहे. याआधी त्यांना दिल्लीकडून अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळाली नव्हती.
दुसरीकडे रोहित शर्मा कर्णधार असलेल्या मुंबई इंडियन्सने अंतिम ११ जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही.
असे आहेत ११ जणांचे संघ –
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), मार्कस स्टोयनिस, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा, एन्रिच नॉर्किए
मुंबई इंडियन्स – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, जेम्स पॅटिन्सन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.
महत्त्वाच्या बातम्या-
बेंगलोरविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर ‘या’ माजी क्रिकेटरचा रायडूवर चढला पारा, म्हणाला…
अरेरे! आयपीएल २०२०मधील पहिल्याच सामन्यात स्टोक्सच्या नशिबी अपयश; ‘या’ गोलंदाजाने उडवली दांडी
“मीच आहे युनिव्हर्सल बॉस…”, हॉस्पिटलमध्ये चिल करत असलेल्या गेलने केले वक्तव्य
ट्रेंडिंग लेख-
वाढदिवस विशेष.! क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा दर्दी ‘महानायक’
‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा