लॉर्ड्सच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर हेडींग्लेच्या मैदानावर भारतीय संघाला १ डाव आणि ७६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह इंग्लंड संघाने ५ कसोटी सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघातील मध्यक्रमातील फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत.
भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे या सामन्यात अवघ्या २८ धावा करू शकला. ज्यामुळे पुन्हा एकदा रहाणेवर टीका केली जाऊ लागली आहे. दरम्यान माजी इंग्लिश कर्णधाराने रहाणेला संघाबाहेर करा, असे म्हटले आहे.
क्रिकबजसोबत चर्चा करताना माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉन यांनी म्हटले की, “अजिंक्य रहाणे भारतीय संघासाठी एक अडचण आहे. जसं इंग्लंडने जॅक क्रॉली आणि डॉम सिब्लेला संघाबाहेर केलं, तसंच भारतीय संघाने देखील संघात बदल करायला हवे.”
रहाणे गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. त्याने शेवटचे शतक ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या मेलबर्न कसोटीत झळकावले होते. त्यानंतर त्याला एकही शतक करता आले नाही. इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत त्याला एक अर्धशतक झळकावण्यात यश आले आहे.
रहाणेसह कर्णधार विराट कोहली देखील साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचे शतक २०१९ मध्ये बांगलादेश संघाविरुद्ध झळकावले होते. तसेच इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत देखील तो मोठी खेळी खेळण्यास अपयशी ठरला आहे. हेडिंग्ले कसोटीत तो ५५ धावा करत माघारी परतला होता. (Ajinkya Rahane is an issue for team india and they should make change like england did before 4th test)
लीड्स कसोटीत भारतीय संघाचा १ डाव ७६ धावांनी पराभव
या सामन्यातील पहिल्या डावात भारताला ७८ धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंड संघाने ४३२ धावा करत ३५४ धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवशी मजबूत पकड बनवल्यानंतर चौथ्या दिवशी भारतीय फलंदाज चांगली फलंदाजी करतील अशी आशा व्यक्त केली गेली होती. परंतु, इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
दिवसाच्या सुरुवातीलाच चेतेश्वर पुजारा ९१ धावा करत माघारी परतला. त्याच्या पाठोपाठ विराट कोहली देखील ५५ धावा करत माघारी परतला. तसेच अजिंक्य रहाणे अवघ्या १० तर रिषभ पंत १ धाव करत स्वस्तात माघारी परतले. शेवटी जडेजाने ३० धावांची झुंज दिली. परंतु, ही झुंज अपयशी ठरली. भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या २७८ धावांवर संपुष्टात आला. हा सामना इंग्लंड संघाने १ डाव आणि ७६ धावांनी आपल्या नावावर केला. यासह मालिका १-१ च्या बरोबरीत आणली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडचे ‘हे’ दोन भेदक गोलंदाज पुनरागमन करण्यासाठी सज्ज; भारताच्या वाढवू शकतात अडचणी
‘हे तर डीव्हीडी सारखे’, विराटच्या बाद होण्याच्या पद्धतीवर माजी इंग्लिश कर्णधाराने उडवली खिल्ली