हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघावर १ डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंड संघाने मालिका १-१ च्या बरोबरीत आणली आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात ऑली रॉबिन्सनने सर्वाधिक ५ गडी बाद केले होते. ज्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
या डावात त्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीला देखील बाद केले होते. दरम्यान सामना झाल्यानंतर त्याने विराटला बाद केल्यानंतरचा अनुभव व्यक्त केला आहे.
भारतीय कर्णधार विराट कोहली दुसऱ्या डावात चांगल्या लयीत फलंदाजी करताना दिसून येत होता. परंतु, त्याला ऑली रॉबिन्सनने ५५ धावांवर बाद करत भारतीय संघाला मोठा धक्का दिला होता. ९० व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर ऑली रॉबिन्सनने अप्रतिम चेंडू टाकला. तो चेंडू बॅटचा कडा घेत जो रुटच्या हातात गेला होता.
सामना झाल्यानंतर आनंद व्यक्त करत रॉबिन्सन म्हणाला, “हा एक सुखद अनुभव होता. येथील प्रेक्षक अविश्वसनीय आहेत. जेव्हा मी विराटला बाद केले, त्यानंतर प्रेक्षकांनी जो आवाज केला होता, तो अविश्वसनीय होता. गेली काही वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होती. मी इथे येण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.”
भूतकाळात ऑली रॉबिन्सनने वर्णभेदी टीका करणारे ट्विट केले. ज्याचे स्क्रीनशॉट जून महिन्यात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर ईसीबीने त्याच्यावर कारवाई देखील केली होती. ज्यामुळे त्याला काही वेळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते.(Ollie Robinson responds to his feeling after taking virat Kohli’s wicket)
“जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करत असता, तेव्हा तुम्ही चौकशी पासून काही काळ दूर असता, परंतु याचा अर्थ असा मुळीच नाही की, ते तुमच्या स्मरणातून निघून जाईल. मी अजूनही मेहनत घेऊन स्वतःला एक चांगला व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हापासून माझे संघात पुनरागमन झाले आहे. तेव्हापासून जेम्स अँडरसन माझा जवळचा मित्र झाला आहे. मी त्याच्यासोबत रोज चर्चा करत असतो मला त्याच्याकडून खूप काही शिकायचं आहे,” असे रॉबिन्सन म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडचे ‘हे’ दोन भेदक गोलंदाज पुनरागमन करण्यासाठी सज्ज; भारताच्या वाढवू शकतात अडचणी
‘हे तर डीव्हीडी सारखे’, विराटच्या बाद होण्याच्या पद्धतीवर माजी इंग्लिश कर्णधाराने उडवली खिल्ली
शाकिब अल हसनने निवडला सर्वकालीन वनडे संघ; धोनीला केले कर्णधार, तर या दोन भारतीयांनाही स्थान