---Advertisement---

ठरले! अजिंक्य रहाणे आयपीएल २०२०मध्ये खेळणार या संघाकडून

On: गुरूवार, नोव्हेंबर 14, 2019 7:09 PM
---Advertisement---

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे पुढीलवर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमीयर लीगच्या 13 व्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे.  राजस्थान रॉयल्स त्याचे ट्रेडिंग दिल्ली संघाशी केले आहे.

आज आयपीएल 2020 चा ‘ट्रेडिंग विंडो’चा शेवटचा दिवस होता. ही ट्रेडिंग विंडो बंद होण्याआधी रहाणेचे ट्रेडिंग दिल्ली कॅपिटल्स संघात झाले आहे. राजस्थान रॉयल्सला रहाणेच्या बदल्यात दिल्लीकडून त्यांचे राहुल तेवतिया आणि मयंक मार्कंडे हे 2 खेळाडू मिळाले आहेत.

याबद्दल दिल्ली कॅपिटल्सचे सहसंघमालक पार्थ जिंदाल म्हणाले, ‘राहुल आणि मयंक हे दोघेही अत्यंत प्रतिभाशाली क्रिकेटपटू आहेत. त्यांच्यासमोर उज्ज्वल भविष्य आहे. मला विश्वास आहे की ते दोघेही राजस्थान रॉयल्सकडून चांगली कामगिरी करतील.’

तसेच जिंदाल म्हणाले, ‘आम्ही भारताचा उत्कृष्ट फलंदाज अजिंक्य राहणेचे स्वागत करतो. आम्हाला विश्वास आहे की त्याचा अनुभव संघासाठी मदतशीर ठरेल.’

दिल्ली संघाने त्यांची फलंदाजी अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने रहाणेला संघात समाविष्ट करुन घेतल्याची शक्यता आहे. दिल्लीकडे आधीच श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिखर धवन, पृथ्वी शॉ असे फलंदाज संघात आहेत.

रहाणेने आयपीएलमध्ये 2008 च्या पहिल्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते. तो 2008 आणि 2009 चा मोसम मुंबईकडून खेळला. त्यानंतर 2010 च्या आयपीएल मोसमात रहाणे खेळला नाही.

2011 मध्ये राजस्थान रॉयल्सने रहाणेला त्यांच्या संघात घेतले. तेव्हापासून गेले 9 मोसम तो राजस्थानकडून खेळला आहे. तसेच त्याने राजस्थान संघाचे काही सामन्यात नेतृत्वही केले आहे. पण आता तो आयपीएल 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसेल.

रहाणेने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 140 सामने खेळले असून 122 च्या स्टाइक रेटने 3820 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 2 शतके आणि 27 अर्धशतके केली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---