---Advertisement---

…तर अजिंक्य रहाणे या विक्रमांच्या यादीत टाकू शकतो धोनी, उम्रीगर सारख्या दिग्गजांना मागे

---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर – गावसकर मालिकेमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघासाठी पुढील वाटचाल अवघड मानली जात होती. नियमित कर्णधार विराट कोहलीची पालकत्व रजा व जवळजवळ दहा प्रमुख खेळाडूंची दुखापत भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरत होती. मात्र या सर्व कठीण परिस्थितीतही कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या फलंदाजी व नेतृत्व क्षमतेची चुणूक दाखवत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या अजिंक्यकडे आगामी इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. अजिंक्यने आतापर्यंत 69 कसोटी सामन्यात 42.58 च्या सरासरीने 4471 धावा केलेल्या आहेत. यादरम्यान अजिंक्यने 12 शतक झळकावले आहेत.

अजिंक्यने जर इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 406 धावा केल्या तर तो महेंद्रसिंग धोनीला कसोटी क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत मागे पाडू शकतो. धोनीने 90 कसोटी सामन्यात 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केलेल्या आहेत. धोनीने आपल्या कारकिर्दीत 6 शतकं केली आहेत.

अजिंक्यकडे पॉली उम्रीगर यांचा देखील एक मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. अजिंक्य प्रमाणेच पॉली उम्रीगर यांनीदेखील कसोटी क्रिकेटमध्ये 12 शतके ठोकली होती. अजिंक्यने जर आणखी एक शतक ठोकले तर तो उम्रीगर यांना मागे टाकेल. अजिंक्य सध्या शानदार फॉर्ममध्ये असून इंग्लंड विरुद्ध देखील तो ऑस्ट्रेलियातील कामगिरीची पुनरावृत्ती करेल अशी सर्वांना आशा आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत रिषभ फक्त फलंदाज म्हणून खेळणार? फलंदाजी प्रशिक्षकांनी दिले ‘हे’ उत्तर

पुजाराने केला खुलासा, ‘ब्रिस्बेन कसोटी संपूर्ण शरीरावर चेंडू आदळत होते, पण मी…’

अविश्वसनीय झेल…! बिग बॅश लीगमध्ये ‘या’ खेळाडूने पकडला भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---