इंडियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून भारतीय संघाला आजपर्यंत अनेक स्टार खेळाडू मिळाले आहेत. आयपीएल खासकरून युवा खेळाडूंना स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी देते, असे बोलले जाते. मात्र, आयपीएलच्या माध्यमातून भारतीय संघाच्या काही दिग्गजांना देखील राष्ट्रीय पातळीवर पुनरागमनाची संधी मिळाली आहे. चालू आयपीएल हंगामात देखील असेच काहीसे अजिंक्य रहाणेच्या बाबतीत होऊ शकते.
अजिंक्य रहाणे यावर्षी पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळत आहे. नवीन फ्रँचायझीसोबत खेळताना रहाणे चांगलाच फॉर्ममध्ये आहे. रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आमना सामना झाला. रहाणेने या सामन्याती सीएसकेसाटी अवघ्या 29 चेंडूत नाबाद 71 धावा कुटल्या. यात 6 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. रहाणेने चालू आयपीएल हंगामात आतापर्यंत पाच सामने खेळेळे असून यात 52.25च्या सरासरीने आणि 199.04च्या स्ट्राईक रेटने 209 धावा केल्या आहेत. रहाणेचा हा फॉर्म पाहता त्याला आगामी वनडे विश्वचषकात खेळवण्याविषयी भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांना विचार करावा लागू शकतो.
यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतात आयसीसी वनडे विश्वचषक आयोजित केला जाणार आहे. या प्रमुख स्पर्धेत अजिंक्य रहाणे भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. मागच्या काही महिन्यात संघ व्यवस्थापनाने चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव () याला आजमावून पाहिले, पण त्याला संघासाठी अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. सूर्यकुमार यादव याने मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सूर्यकुमार तिन्ही सामन्यांमध्ये गोल्डन डकवर (पहिल्या चेंडूवर शुन्य धावा करून) बाद झाला. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 23 वनडे सामन्यांमध्ये 24च्या सरासरीने 433 धावा केल्या आहेत. अशात संघासाठी चौथ्या क्रमांकावर लवकरच सूर्यकुमाला पर्यायी खेळाडू शोधावा लागू शकतो.
दुसरीकडे मागच्या तीन वर्षात भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर मात्र चांगले प्रदर्शन करत आला आहे. मात्र, त्याला नुकतीच कंबरेला दुखापत जाली आहे आणि वनडे विश्वचषकासाठी तो फिट होणार की नाही, याविषयीही देखील संभ्रम आहे. अय्यरला दुखापतीमुळे शस्त्रक्रियेला देखील सामोरे जावे लागले आहे. अशा परिस्थितीत रहाणे विश्वचषकादरम्यान भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. सध्याचा त्याचा फॉर्म पाहता त्याला संघात घेतल्यानंतर संघाला फायदा होण्याची शक्यता देखील अधिक आहे. (Ajinkya Rahane may get a chance to play at number four for the ODI World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडचा दिग्गज कर्णधार आणि रहाणेची तुलना! माजी इग्लिश फलंदाजाची प्रतिक्रिया चर्चेत
कोलकात्यात मिळालेल्या प्रेमाने भारावला धोनी! म्हणाला, “तुम्ही मला निरोप देण्यासाठी…”