मुंबई। 21 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीने 15 जणांचा मुंबईचा संघ शनिवारी जाहिर केला आहे. या मुंबई संघाच्या कर्णधारपदी भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणेची निवड करण्यात आली आहे.
त्याचबरोबर पृथ्वी शॉचाही या स्पर्धेसाठी मुंबई संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये जवळजवळ अडीच महिन्यांंनंतर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. शॉला मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धच्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना डाव्या पायाच्या घोट्याची दुखापत झाली होती.
शॉबरोबरच या स्पर्धेसाठी मुंबई संघात श्रेयस अय्यर, धवल कुलकर्णी, सुर्यकुमार यादव आणि शार्दुल ठाकूर या खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.
मुंबईच्या या 15 सदस्ययी संघाचे नेतृत्व सोपवलेल्या रहाणेने नुकतेच इराणी ट्रॉफी स्पर्धेत विदर्भाविरुद्ध शेष भारत संघाच्या कर्णधारपदाची धूरा सांभाळली होती. या सामन्यात रहाणेला पहिल्या डावात खास काही करता आले नव्हते, पण त्याने दुसऱ्या डावात 87 धावांची खेळी केली होती.
मात्र हा सामना अनिर्णित राहिला पण पहिल्या डावातील आघाडीमुळे विदर्भाला विजेते घोषित करण्यात आले.
तसेच त्याआधी इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध वनडे मालिकेतही भारत अ संघाचे नेतृत्व करताना रहाणेने पहिल्या दोन सामन्यात अर्धशतकी खेळी केल्या होत्या.
परंतू रहाणेला 24 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयश आले आहे.
असा आहे मुंबईचा संघ-
अजिंक्य रहाणे(कर्णधार), पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर, धवल कुलकर्णी, सिद्धेश लाड, आदित्य तरे, सुर्य कुमार यादव, आकाश पारकर, एकनाथ केरकर, धुर्मिल मटकर, शाम्स मुलानी, शुभम रांजणे, तुषार देशपांडे, रायस्टन डायस.
महत्त्वाच्या बातम्या-
–२००० सालापुर्वी पदार्पण केलेले हे ५ खेळाडू विश्वचषकानंतर घेऊ शकतात निवृत्ती
–२०१९ विश्वचषकानंतर निवृत्त होणाऱ्या ख्रिस गेलबद्दल कधी न ऐकलेल्या १० गोष्टी
–केएल राहुलची निवड करताना अजिंक्य रहाणेवर अन्याय? वाचा