आयपीएल २०२२ हंगामातील साखळी फेरी सामने संपायला आले आहेत. त्यामुळे प्लेऑफचे तिकीट मिळवण्यासाठी संघ जोर लावताना दिसत आहेत. दरम्यान सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पुणे येथे हंगामातील ६१वा सामना खेळला गेला. कोलकाताने ५४ धावांनी हा सामना जिंकला.
परंतु या विजयात त्यांचा सलामीवीर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याचे जास्त योगदान राहिले नाही. तो पुन्हा एकदा स्वस्तात विकेट गमवत तंबूत परतला, ज्यामुळे त्याच्यावर टिकांचा भडिमार (Ajinkya Rahane Trolled) झाला. परंतु या सामन्यादरम्यान रहाणे अजून एक बाजू पाहायला मिळाली, जी कौतुकास्पद होती.
हैदराबादविरुद्ध (SRH vs KKR) रहाणे वेंकटेश अय्यरसह सलामीला फलंदाजीला आला होता. डावातील दुसऱ्याच षटकात वेंकटेशची विकेट गमावल्यानंतरही त्याने चांगला खेळ दाखवला. आक्रमक पवित्रा हाती घेत त्याने ३ षटकारांच्या मदतीने २८ धावा फटकावल्या. परंतु ही छोटेखानी खेळी केल्यानंतर लगेचच आठव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. उमरान मलिकच्या गोलंदाजीवर शशांक सिंगच्या हाती झेल देऊन तो बाद झाला.
स्वस्तात विकेट गमावल्यानंतर रहाणेवर भरपूर टीका झाली. काहींनी तर त्याला ‘पिल्लू क्रिकेटर’ म्हणत ट्रोल केले. परंतु या सामन्यादरम्यान रहाणेला दुखापत झाली असतानाही तो एखाद्या लढवय्याप्रमाणे मैदानावर खेळत राहिला होता. फलंदाजी करत असताना त्याच्या मांडीचे स्नायू ताणले (Ajinkya Rahane Muscle Injury) गेले होते. यामुळे त्याला फलंदाजी करताना, धाव घेत असताना असह्य अशा वेदनाही होत होत्या. तरीही संघासाठी हा सामना महत्त्वाचा असल्याने तो प्रथमोपचार घेत खेळत राहिला होता.
रहाणेने संघाप्रती दाखवलेली ही भावना नक्कीच कौतुकास पात्र होती. कदाचित याचमुळे २८ धावांवर बाद झाल्यानंतरही कोलकाता संघाने ट्वीट करत त्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते. ‘आमच्या नाईटचा शूर प्रयत्न’, अशा शब्दांत कोलकाताने रहाणेवर कौतुकाची थाप मारली होती.
Valiant effort by our Knight, @ajinkyarahane88 👏#AmiKKR #KKRvSRH #IPL2022 pic.twitter.com/Z5onogpOiD
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 14, 2022
दरम्यान रहाणे आयपीएल २०२२मधील प्रदर्शन सरासरी राहिले आहे. तो आतापर्यंत ७ सामने खेळताना १९च्या सरासरीने १३३ धावाच करू शकला होता. यादरम्यान त्याच्या बॅटमधून साधे अर्धशतकही निघालेले नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
तेव्हा मायदेशात भारताला धूळ चारण्यासाठी पाकिस्तानने बनवला होता ‘असा’ प्लॅन, तरीही झाले होते अपयशी
ब्रेकिंग! पुण्यात होणाऱ्या महिला आयपीएलसाठी तीन संघांतील खेळाडूंची घोषणा, ‘या’ तिघींकडे कर्णधारपद
जबराट! बटलर-परागने मिळून बाऊंड्रीजवळ अफलातून कॅच घेत कृणालला धाडले माघारी, पाहा Video