सेंच्युरियनच्या (Centurion) मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबर पासून सुरू झाला असून या सामन्यातील पहिल्या दिवशी पूर्णपणे भारतीय फलंदाजांचा बोलबाला राहिला. पहिल्या डावात केएल राहुलने तुफानी शतक झळकावले, तर कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे देखील फॉर्ममध्ये परतल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान फलंदाजी करताना तो एका मंत्राचा जप करताना दिसून आला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. ज्यामुळे त्याला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरू लागली होती. परंतु, संघ व्यवस्थापकांनी त्याला संधी दिली, मात्र, उपकर्णधारपद काढून घेतले. पण पहिल्या कसोटी सामन्यात मिळालेल्या संधीचा त्याने पुरेपूर वापर केल्याचे पाहायला मिळत आहे. (Ajinkya Rahane repeatedly chanting mantra)
अजिंक्य रहाणेला जाणीव आहे की, त्याच्यासाठी ही शेवटची संधी असू शकते. या मालिकेत जर तो फ्लॉप ठरला, तर त्याच्यावर संघाबाहेर जाण्याची वेळ येऊ शकते. ज्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात तो नियंत्रणात फलंदाजी करताना दिसून आला. दरम्यान व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तो ‘वॉच द बॉल’ चा जप करताना दिसून येत आहे. प्रत्येक चेंडू खेळण्यापूर्वी तो ‘वॉच द बॉल’ असे म्हणत होता. ज्यामुळे तो आणखी नियंत्रणात शॉट खेळत होता.
https://twitter.com/testaahebest/status/1475122882913005572?t=JhOHifDfrbv7T920EmYHBg&s=19
पहिल्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत रहाणेला ८१ चेंडूंमध्ये ४० धावा करण्यात यश आले आहे. तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर केएल राहुल पहिल्या दिवसाखेर नाबाद १२२ धावा करून मैदानावर टिकून आहे. भारतीय संघाने ३ गडी बाद २७२ धावा केल्या आहेत. लुंगी एन्गिडीने भारतीय संघातील तीनही फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.
महत्वाच्या बातम्या :
अंडर १९ असो नाहीतर राष्ट्रीय संघ, ‘या’ कर्णधारांनी नेहमीच दाखवला जलवा
हर्षा भोगलेंनी निवडली ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’! ‘या’ तिघा भारतीयांची लागली वर्णी
वेदनादायक सुरुवात! बॉक्सिंग डे कसोटीत पुजारा शुन्यावर बाद; ‘हा’ नकोसा विक्रमही केलाय नावावर
हे नक्की पाहा- त्या दिवशी विराटने शतक केलं अन् गंभीरने दिली भारी भेट