इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघावर १ डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना, एक प्रसंग असा देखील घडला होता. जेव्हा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने कर्णधार कोहलीचा विकेट वाचवली होती.
तर झाले असे की, लीड्स कसोटीचा चौथ्या दिवशी भारतीय संघांची फलंदाजी सुरू होती. अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली हे दोघेही खेळपट्टीवर उपस्थित होते. दरम्यान, ८७ व्या षटकात जेम्स अँडरसनने टाकलेल्या चेंडूवर इंग्लिश खेळाडूंनी विराट कोहली विरुद्ध झेलबादची जोरदार मागणी केली होती आणि पंचांनी त्याला बाद देखील घोषित केले होते. त्यावेळी विराट कोहली निराश होऊन पॅव्हेलियनच्या दिशेने जात होता.
इंग्लंड संघातील सर्व खेळाडू विराट कोहली बाद झाल्यामुळे जल्लोष साजरा करत होते. इतक्यात अजिंक्य रहाणेने विराट कोहलीला बोलावून घेतले आणि त्याला डीआरएस घेण्यास सांगितले. डीआरएस घेतल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंच्या जल्लोषावर पूर्णविराम लागला होता.
डीआरएसमध्ये स्पष्टपणे दिसून आले की, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नव्हता. बॅट त्याच्या पॅडला लागली होती.ज्यामुळे तो नाबाद राहिला. विराटने ९० व्या षटकात आपले अर्धशतक झळकावले होते, परंतु, तो अर्धशतराचे रुपांतर मोठ्या खेळीत करू शकला नाही. तो अवघ्या ५५ धावा करत माघारी परतला. तसेच अजिंक्य रहाणे देखील अवघ्या १० धावा करत माघारी परतला.(Ajinkya Rahane saves Virat Kohli on James Anderson bowling)
पुजाराचेही शतक हुकले
तिसऱ्या दिवसअखेर चेतेश्वर पुजारा ९१ धावांवर नाबाद परतला होता. त्यामुळे चौथ्या दिवशी तो शतक झळकावून मोठी खेळी खेळणार अशी आशा व्यक्त केली गेली होती. परंतु, सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. तो ९१ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑली रॉबिन्सन अप्रतिम आत येणारा चेंडू टाकला होता, तो पूजराच्या पॅडला जाऊन धडकला होता. रॉबिन्सनने जोरदार मागणी केल्यानंतर पंचांनी ती मागणी फेटाळून लावली होती.
त्यानंतर इंग्लंडने डीआरएस घेतला असता, तो बाद असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही आणि भारताचा डाव २७८ धावांवर संपला.
महत्त्वाच्या बातम्या –
रहाणे नसता, तर विराटचे अर्धशतक झळकावणे होते कठीण, वाचा काय घडले नक्की
‘कर्णधार’ विराट कोहली सेना देशांमध्ये ठरतोय फ्लॉप! नको असलेल्या यादीत धोनीनंतर मिळवले दुसरे स्थान