---Advertisement---

मुंबई कसोटीत विराट कोणाच्या जागेवर खेळणार? अजिंक्य रहाणे म्हणतोय…

On: मंगळवार, नोव्हेंबर 30, 2021 4:22 PM
Virat-Kohli-and-Ajinkya-Rahane
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. मुंबईत जन्म घेतलेल्या एजाज पटेलने आणि कर्नाटकच्या रचीन रवींद्रने हा कसोटी सामना अनिर्णित करण्यात मोलाची भूमिका बजावली. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेच्या हाती देण्यात आले होते, तर दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीचे पुनरागमन होणार आहे.

आता विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाल्यानंतर तो कुठल्या खेळाडूचे स्थान घेणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. याबाबत अजिंक्य रहाणेने एक मोठा खुलासा केला आहे.

अजिंक्य रहाणेला गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. त्याने सामना झाल्यानंतर पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या श्रेयस अय्यरचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्याने म्हटले की, “मी श्रेयस अय्यरसाठी खूप खुश आहे. त्याला पदार्पण करण्यासाठी खूप वाट पाहावी लागली आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. विराट पुढील सामन्यात पुनरागमन करणार आहे. परंतु, तो प्लेइंग ईलेव्हेनमध्ये कोणाचे स्थान घेईल, याबाबतचा निर्णय संघ व्यवस्थापन करणार आहे.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “हा एक चांगला सामना होता. न्यूझीलंड संघातील खेळाडूंनी देखील चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. तसेच पहिले सत्र संपल्यानंतर आम्ही देखील जोरदार पुनरागमन केले.” तसेच अजिंक्य रहाणेला डाव लवकर घोषित करण्याबाबत विचारण्यात आले त्यावेळी त्याने त्या गोष्टीस नकार दिला.

न्यूझीलंडच्या कर्णधाराने गोलंदाजांचे केले कौतुक
न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसनने म्हटले की, “आमचे गोलंदाज टीम साउदी आणि काइल जेमिसन यांनी चांगली गोलंदाजी केली. मोठ्या स्पेल टाकण्याचा हा एक अविश्वसनीय प्रयत्न होता. आम्हाला माहीत आहे की, हा भारतीय संघ खूप मजबूत संघ आहे. एकंदरीत हा सामना खूप चांगला रंगला. आम्हाला मुंबईच्या खेळपट्टीसाठी विशेष तयारी करावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

राहुल तेवतिया अडकला लग्नाच्या बेडीत, नव्या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचली ‘ही’ क्रिकेटर मंडळी

कपिल देवच्या नेतृत्त्वाखालील विश्वचषक विजयाचा प्रवास येणार सर्वांसमोर; ‘८३’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Video: शार्दुल ठाकूरच्या साखरपुड्याला हिटमॅनची हजेरी, अनोख्या अंदाजात रोहितकडून मित्राला शुभेच्छा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---