भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज आणि कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. आयपीएल २०२२मध्ये रहाणे कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. हंगाम संपल्यानंतर रहाणे आता घरी परतला असून त्याची मुलगी आर्याचा अभ्यास घेताना पाहिला गेला आहे. त्याने स्वतः एक खास व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली आहे.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि राधिका धोपवकर यांनी २०१४ साली लग्न केले. राधिका ही अजिंक्यची लहानपणीची मैत्रीण असून पुढे त्यांनी लग्न केले. २०१९मध्ये त्यांना मुलगी झाली, जिचे नाव त्यांनी आर्या (Aarya) ठेवले. आर्या अजून लहान असून अजिंक्य रहाणे तिचा अभ्यात घेत असतो. रहाणेने बुधवारी (१ जून) एक असाच निरागस व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आर्याचा अभ्यास घेत आहे.
व्हिडिओत रहाणे स्वतः आर्यासोबत एबीसीडी म्हणताना दिसत आहे. चाहत्यांकडून व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. व्हिडिओला रहाणेने एक मजेशीर कॅप्शन देखील दिले आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “मी मागच्या काही वर्षांमध्ये माझ्या शाळेतील दिवसांपेक्षा जास्त अभ्यास केला आहे.”
https://www.instagram.com/p/CeSwrXVB643/?utm_source=ig_web_copy_link
अजिंक्यने अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केलेला हा व्हिडिओ खूप कमी वेळात सर्वत्र व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे त्यातील बाप आणि लेकीमधील जिव्हाळ्याचे संबंध. रहाणे यामध्ये मुलीसोबत मराठीत बोलताना देखील दिसत आहे. व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करून स्वतःची प्रतिक्रिया दिली आहे. एकाने “लिटिल एन्जल आर्या” लिहिले आहे तर, तर एका चाहत्याने असेल लिहिले की, “ही बाप आणि लेकीची सर्वात भारी जोडी आहे.” २४ तासांच्या आतमध्ये या व्हिडिओला चाहत्यांकडून तब्बल ६४ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत.
दरम्यान, आयपीएल २०२२ मध्ये केकेआरसाठी खेळणारा अजिंक्य रहाणे संपूर्ण हंगामात संघाचे प्रतिनिधित्व करू शकला नाही. एका सामन्यादरम्यान त्याच्या पायाला दुखात झाल्यामुळे त्याला हंगामाच्या मध्यातून माघार घ्यावी लागली. त्याने खेळलेल्या ७ सामन्यांमध्ये देखील त्याचे प्रदर्शन खूपच साधारण राहिले. ७ सामन्यांमध्ये १९.०० च्या सरासरीने आणि १०३.९१ च्या स्ट्राईक रेटने १३३ धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
राजस्थानसाठी बटलरसह ‘या’ तीन खेळाडूंनी गाजवलीये यंदाची आयपीएल, चोपल्यात सर्वात जास्त धावा
‘या’ २ भारतीय खेळाडूंनी यूएसएला मिळवून दिला विजय, वनडेतील दमदार संघाला चारली धूळ
दे घुमा के! लियाम लिविंगस्टोनने मारला असा षटकार की, कंस्ट्रक्शन साईटवर जाऊन पडला चेंडू- Video