भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे हा जवळपास वर्षभरापासून राष्ट्रीय संघाबाहेर आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेट तसेच आयपीएलमधून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला सातत्याने अपयश येत आहे. त्यामुळे त्याने आता पुन्हा एकदा राष्ट्रीय संघासाठी खेळण्याकरिता काऊंटीचा मार्ग निवडला. यावर्षी आयपीएलनंतर तो इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळताना दिसेल.
इंग्लंडमधील प्रसिद्ध काऊंटी क्लब लिसेस्टरशायरने आपण रहाणेला करारबद्ध करत असल्याची घोषणा नुकतीच केली. तो आयपीएलनंतर काऊंटी चॅम्पियनशिप तसेच रॉयल लंडन वनडे कप या दोन स्पर्धा खेळताना दिसेल. लिसेस्टरशायर संघाकडून त्याच्या नावाची घोषणा करताना सांगितले गेले की,
✍️ Leicestershire CCC is thrilled to confirm the signing of India star @ajinkyarahane88 for the 2023 season. 🇮🇳
The former @BCCI captain will join in June for 8 County Championship matches and the entirety of the One Day Cup. 🤩
Full story. 👇
— Leicestershire CCC 🏏 (@leicsccc) January 31, 2023
‘आम्ही ही घोषणा करताना रोमांचित होत आहोत की, भारताचा सितारा अजिंक्य रहाणे यावर्षी आपल्यासाठी खेळेल. भारताचे नेतृत्व केलेला हा खेळाडू आपल्यासाठी 8 काऊंटी सामने व संपूर्ण रॉयल लंडन कप खेळणार आहे.’
🤳 A message to the #FoxesFamily from our newest recruit. 🦊💚
🎟️ See him in action this summer: https://t.co/l3FspkYSxp
🦊#MomentsThatMatter pic.twitter.com/xa0GbtmXLk
— Leicestershire CCC 🏏 (@leicsccc) January 31, 2023
रहाणेने देखील एक व्हिडिओ शेअर करत आपण संघासाठी खेळण्यासाठी उत्साही असल्याचे म्हटले आहे. रहाणे यापूर्वी देखील इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळला होता. 2019 हंगामात त्याने हॅम्पशायर क्लबचे प्रतिनिधित्व केले होते. सध्या भारताचे चेतेश्वर पुजारा, उमेश यादव, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर व कृणाल पंड्या हे खेळाडू विविध काऊंटी क्लबसाठी खेळताना दिसतात.
रहाणेचा विचार केल्यास तो जानेवारी 2022 नंतर भारतासाठी खेळलेला नाही. त्याने आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत 82 कसोटी खेळताना 38.52 च्या सरासरीने 4931 धावा केल्या आहेत. यामध्ये 12 शतकांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त त्याला भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी मिळाली. त्याच्याच नेतृत्वात भारताने 2020-2021 ची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ऑस्ट्रेलियात जाऊन जिंकण्याचा कारनाम केला होता. सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी 2022-2023 मध्ये त्याने मुंबईचे नेतृत्वही केले. मात्र, संघाला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करता आला नाही
(Ajinkya Rahane To Play For Lecestershire County Club After IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“युवा खेळाडूंनी धोनीकडून शिकावे”, माजी प्रशिक्षकाने दिला मोलाचा सल्ला
IND vs AUS | पहिल्या कसोटीत पदार्पण करू शकतो ‘हा’ ऑसी वेगवान गोलंदाज, खेळपट्टीविषयी दिली खास प्रतिक्रिया