---Advertisement---

अजिंक्य रहाणेकडून वाढदिवसाच्या दिवशीच आदित्य ठाकरेंचं जोरदार कौतूक

On: शनिवार, जून 13, 2020 12:02 PM
---Advertisement---

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आज वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. १३ जून १९९० रोजी जन्म झालेले आदित्य ठाकरे आज आपला ३०वा वाढदिवस साजरा करत आहेत.

अजिंक्यने ट्विटरवर आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे की,  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आदित्य. तु महाराष्ट्रासाठी घेत असलेले कष्ट पाहून आम्हाला तुझा अभिमान वाटतो. तुला हे वर्ष सुखसमृद्धीचे जावो.

यापुर्वी अनेक वेळा आदित्य व अजिंक्य हे एकमेकांचे कौतूक करताना ट्विटरवर नेटिझन्सने पाहिले आहे. एप्रिल महिन्यातच अजिंक्यने आदित्य कोरोना लाॅकड़ाऊनमध्ये करत असलेल्या कामाचे कौतूक केले होते.

३० वर्षीय आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळातील एका युवा मंत्र्यांपैकी आहेत. तर अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असून भारताकडून ६५ कसोटी, ९० वनडे व २० टी२० सामने खेळला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---