मुंबई । किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स संघ यांच्यात आयपीएल 2020 चा सहावा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने 97 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला. सामना जिंकल्यामुळे पंजाबच्या संघाने 2 महत्त्वाचे गुण मिळवले. या पराभवानंतर कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
विराट कोहलीने पंजाबच्या डावातील शेवटची षटक शिवम दुबेला दिले, पण केएल राहुल क्रीजवर उपस्थित होता आणि त्याने शेवटच्या षटकात एकूण 23 धावा जमविल्या.
शिवम दुबेला अखेरच्या षटकात गोलंदाजी करण्यास देण्याच्या विराट कोहलीच्या निर्णयावर अजित आगरकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, “शिवब दुबेने पहिले दोन षटके चांगली गोलंदाजी केली, पण जेव्हा शेवटच्या षटकात गोलंदाजी करण्याची वेळ येते तेव्हा आपल्या मुख्य गोलंदाजांकडे ही जबाबदारी सोपवणे गरजेचे होते. कारण त्यावेळी केएल राहुलने शतक ठोकले होते. टी -20 क्रिकेटमध्ये अवघ्या काही चेंडूत खेळ बदलतो.”
या सामन्यात पाठलाग करताना आरसीबीने 4 धावांवर 3 विकेट्स गमावल्या, तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि 5 चेंडूंत 1 धावा काढून तो बाद झाला. यापूर्वी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. तथापि, आगामी सामन्यात विराट कोहलीला आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करायला आवडेल.
विराटच्या फलंदाजीक्रमाबद्दल अजित आगरकर म्हणाले, “विराट कोहलीने कधीही तिसर्या क्रमांकाच्या खाली फलंदाजी करू नये. त्याने डावाची सुरूवात करावी, परंतु ऍरोन फिंचच्या उपस्थितीने हे होऊ शकत नाही, परंतु तो तिसर्या क्रमांकाच्या खाली खेळू नये. तो तिसर्या क्रमांकावर खेळण्यास आला नाही हे पाहून मी आश्चर्यचकित झालो. संघासाठी हा योग्य निर्णय नव्हता.”