भारतीय क्रिकेट वर्तुळात सातत्याने चर्चेत असलेल्या वरिष्ठ निवड समितीला लवकरच नवा अध्यक्ष मिळणार आहे. चेतन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या या पदावर अद्याप कोणतीही व्यक्ती विराजमान झालेली नाही. आता त्या जागेसाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. रिक्त जागा उत्तर विभागातील असली तरी त्या जागी पश्चिम विभागातील माजी खेळाडू अर्ज करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या जागी आता माजी मुंबईकर क्रिकेटपटूची वर्णी लागण्याची शक्यता वाढलीये.
आगामी एक जुलै रोजी या जागेसाठी मुलाखती होतील. भारताचा माजी कसोटपटू अजित आगरकर याचे नाव या सर्वात आघाडीवर आहे. त्याने अर्ज केल्यास तो थेट निवड समिती अध्यक्ष बनू शकतो. सध्या चार जणांच्या असलेल्या निवड समितीत 23 कसोटीसह शिवसुंदर दास सर्वात अनुभवी व्यक्ती आहेत. मात्र, आगरकर 26 कसोटी सामने खेळला असल्याने त्याच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल. तसेच, निवड समितीत पश्चिम विभागाचे प्रतिनिधी म्हणून सलील अंकोला यापूर्वीच सामील आहेत.
याव्यतिरिक्त अनपेक्षितपणे या जागेवर भारताचे माजी कर्णधार तसेच माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची देखील वर्णी लागू शकते. बीसीसीआयचे काही पदाधिकारी त्यांना या पदावर पाहू इच्छितात. शास्त्री यांनी दोन वर्षांपूर्वीच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडले होते. या सर्व खेळाडूंची त्यांना योग्य जाण असल्याने ते देखील अध्यक्ष होण्याच्या शर्यतीत आहे.
तसेच भारताचे माजी कर्णधार व माजी निवडसमिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांच्या देखील नावाचा विचार होऊ शकतो. त्यांनी 2008 ते 2010 या कालावधीत हे पद सांभाळले होते. विराट कोहलीला संधी देण्याचे श्रेय देखील त्यांनाच मिळते. त्यामुळे काही अनपेक्षित निर्णय घडल्यास वेंगसरकर हे या पदावर बसू शकतात.
(Ajit Agarkar Front Runner For Indian Cricket Selection Committee Chief Selector Ravi Shastri And Dilip Vengsarkar In Race)
महत्वाच्या बातम्या
पुणेरी बाप्पा Qualifier 2 मधून आऊट, कोल्हापूर टस्कर्सला मिळालं फायनलचं तिकीट
बुमराह कधी करणार पुरनागमन? विश्वचषकाचे वेळापत्रक येताच समोर आली मोठी अपडेट