भारतीय क्रिकेट बोर्डने बीसीसीआय आशिया चषक 2023 साठी 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. मुख्य संघात 17 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्याचवेळी संजू सॅमसन 18 वा खेळाडू राखीव म्हणून संघाशी जोडला जाईल. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांचीही आशिया चषकसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. मात्र, संघाची घोषणा होताच मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनीही दोन्ही खेळाडूंच्या फिटनेसबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
आशिया चषकसाठी भारतीय संघाची घोषणा करताना भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Agarkar) म्हणाले की, “केएल राहुल (KL Rahul) अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. आशिया चषक स्पर्धेतील सुरुवातीचे एक-दोन सामने तो खेळू शकणार नाही. परंतु, श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त आहे.”
संघाच्या घोषणेच्या वेळी पुढे आगरकर म्हणाले की, “श्रेयस अय्यरला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. ही खूप चांगली बातमी आहे. राहुल अजूनही पुर्णपने बरा झाला नाही. परंतु, आशिया चषकच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यापर्यंत तो तंदुरुस्त होईल अशी आम्हाला आशा आहे. हे दोघेही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे खेळाडू आहेत.”
2023 आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा 17 खेळाडूंचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन (यष्टिरक्षक), रविंद्र जडेजा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.
भारतीय संघ आपला पहिला सामना 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे
आशिया चषक 2023 स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. भारतीय संघ आशिया चषकात 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्याचबरोबर आशिया चषकाचा अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. (ajit agarkar statment kl rahul not playing asia cup starting matches )
महत्वाच्या बातम्या-
शिखरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द समाप्त! निवडसमिती अध्यक्षांनी दिले स्पष्ट संकेत
चहल आणि अश्विन संघातून बाहेर, कर्णधार रोहितने सांगीतले कारण