भारतीय क्रिकेट संघाला वकरच नवीन निवड समिती मिळू शकते. अजित आगरकर याचे नाव निवड समितीच्या नवीन अध्यक्षाच्या रुपात चर्चेत आहे. रवी शास्त्री आणि दिलीप वेंगसरकर यांची नावेही या भूमिकेसाठी चर्चेत आहेत. मात्र, गुरुवारी (29 जून) आगरकरने घेतलेल्या एका निर्णयामुळे त्याच्या नावावर अध्यक्षपदासाठी जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे.
इंडियन प्रीमियर लीगचा दिल्ली कॅपिटल्स संघ यावर्षी अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. संघाच्या सुमार प्रदर्शनानंतर फ्रँचायझी सपोर्ट स्टाफमध्ये बदल करणार अशा चर्चा होत्या. मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांना जबाबदारीतून मुक्त केले जाणार, असे सांगितले जात होते. पण गुरुवारी (29 जून) अजित आगरकर (Ajit Agarkar) आणि शेन वॉटसन (Shane Watson) यांना दिल्ली कॅपिटल्सने आपल्या जबाबदारीतून मुक्त केले. हे दोघेही दिल्ली संघाच्या सहायक प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडत होते.
आगरकरने भारताच्या निवड समिती अध्यक्षाची भूमिका स्वीकारण्यासाठी हे पद सोडल्याचेही सांगितले जात आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून याविषयी माहिती दिली गेली. दिल्ली कॅपिटल्सने पोस्टमध्ये लिहिले की, “तुमच्यासाठी हे नेहमीच घरासारखे असेल. धन्यवाद अजित आणि वॉटसन. भविष्यासाठी शुभेच्छा.”
दरम्यान, अजित आगरकरने यापूर्वी 2021 मध्येच भारतीय संघाच्या मुख्य निवडकर्ता बनण्यासाठी अर्ज केला होता आणि मुलाखतही दिली होती. पण त्यावेळी चेतन शर्मांना ही जबाबदारी मिळाली. यावेळीही आगरकर या पदासाठी इच्छुक दिसत आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार बीसीसीआय आगरकरसाठी मुख्य निवडकर्त्यांच्या वेतनातही वाढ करू शकते. सध्या या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तिचे वार्षिक वेतन एक कोटी आहे. आगरकर ही जबाबदारी स्वीकारणार असेल, तर वेतनात वाढ केली जाऊ शकते. तसेच निवड समितीमधील इतर सदस्यांचे वेतन देखील 90 लाखांवरून वाढवावे लागू शकते.
दिल्ली कॅपिटल्सचे सहायक प्रशिक्षक आणि समालोचक म्हणून आगरकर नक्कीच जास्त पैसे कमावतो. त्यामुळे बीसीसीआय याविषयी निर्णय घेऊ शकते. दुसरीकडे रवी शास्त्रीही भारताचे मुख्य प्रशिक्षकपद सोडल्यानंतर पुन्हा समालोचन करताना दिसत आहेत. शास्त्रींची कमाई देखील मुख्य निडकर्त्यांच्या वेतानापेक्षा जास्त असू शकते. अशात बीसीसीआयला या पदासाठी दिल्या जाणाऱ्या वेतनात येत्या काळात मोठी वाढ करावी लागू शकते. (Ajit Agarkar steps down as Delhi Capitals assistant coach, soon to take charge as India’s chief selector)
महत्वाच्या बातम्या –
क्रिकेटनंतर नवीन इनिंग सुरू करण्यासाठी रायुडू सज्ज, अशाप्रकारे करणार लोकांची सेवा
फिकीर नॉट! अहमदाबादेत IND vs PAK सामना झाला नाही, तर कुठे होईल महामुकाबला? लगेच वाचा