भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. क्रिकेटच्या या महाकुंभमेळ्याचा पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला जाईल. तसेच, विश्वचषकातील भारताचे अभियान 8 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने होईल. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची आधीच घोषणा झाली आहे. अशात भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी विश्वचषकातील ट्रम्प कार्ड ठरणाऱ्या खेळाडूचे नाव सांगितले आहे. विशेष म्हणजे, तो खेळाडू रोहित शर्मा किंवा विराट कोहली हे फलंदाज नसून एक गोलंदाज आहे.
भारतीय संघ रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेत उतरणार आहे. तसेच, भारताच्या उपकर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या खांद्यावर असेल. अशातच विश्वचषकापूर्वी मुख्य निवडकर्ता अजित अगरकर यांनी भारतासाठी ट्रम्प कार्ड (Trump Card) ठरू शकणाऱ्या खेळाडूचे नाव सांगितले आहे.
विश्वचषकातील भारताचा ‘ट्रम्प कार्ड’
विश्वचषकात भारतीय संघाला 9 सामने खेळायचे आहेत. या सामन्यांमध्ये भारताने शानदार प्रदर्शन केले, तर संघाला उपांत्य सामन्यात जाण्याची संधी मिळेल. अशात अझित आगरकर यांनी फिरकीपटू कुलदीप यादव ट्रम्प कार्ड (Kuldeep Yadav Trump Card) ठरू शकतो असे म्हटले आहे.
काय म्हणाले आगरकर?
माध्यमांशी बोलताना अजित आगरकर म्हणाले की, “मी आयपीएलमध्ये त्याच्यासोबत बराच वेळ घालवला आहे. त्याच्याकडे खास कौशल्य आहे. प्रत्येक खेळाडूवर विश्वास दाखवण्याची गरज आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने असे केले आहे आणि परिणाम समोर आहेत. तो आमच्यासाठी एक ट्रम्प कार्ड आहे. अधिकतर संघ त्याला आव्हान समजत आहेत. आम्ही सर्वजण आगामी स्पर्धेसाठी खूपच उत्साहित आहोत.”
Kuldeep Yadav could be India's X-factor with the ball at #CWC23 🔥
✍: https://t.co/jcNoFUQi0I pic.twitter.com/hn6py8ocO0
— ICC (@ICC) September 20, 2023
आशिया चषकात कुलदीपचे दमदार प्रदर्शन
नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने शानदार प्रदर्शन केले होते. त्याने स्पर्धेत 5 सामने खेळत 9 विकेट्स घेतल्या होत्या. खरं तर, कुलदीपने पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट्स आणि श्रीलंकेविरुद्ध 4 विकेट्स नावावर केल्या होत्या. तसेच, आता कुलदीपने विश्वचषकातही चांगली कामगिरी केली, तर भारतीय संघाला मोठा फायदा होऊ शकतो. (ajit agarkar told that this player will make team india the champion in the world cup 2023)
हेही वाचाच-
भारताच्या रणरागिणीने चीनमध्ये घडवला इतिहास! Asian Gamesमध्ये शेफाली ‘असा’ पराक्रम करणारी पहिली भारतीय
वर्ल्डकपपूर्वी कुलदीप यादव पुन्हा बागेश्वर बाबाच्या दर्शनाला, Asia Cupपूर्वीही घेतलेला आशीर्वाद