---Advertisement---

“कर्णधार म्हणून विराटपेक्षा धोनी जास्त आवडतो, तो अजित यांच्यासारखा वाटतो”, वाडेकरांच्या पत्नीकडून कौतुक

On: बुधवार, ऑगस्ट 25, 2021 12:47 AM
MS-Dhoni
---Advertisement---

भारतीय क्रिकेटमध्ये २४ ऑगस्ट या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. सन १९७१ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडच्या धरतीवर याच दिवशी आपला पहिलावहिला कसोटी विजय साजरा केला होता. मंगळवारी या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त एका कार्यक्रमात बोलताना त्या संघाचे कर्णधार असलेल्या दिवंगत अजित वाडेकर यांच्या पत्नीने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याचे कौतुक केले.

तो मला अजित यांच्यासारखा वाटतो
भारतीय संघाच्या इंग्लंड मधील पहिल्या विजयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त एका प्रमुख वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात १९७१ मध्ये भारतीय संघाचे कर्णधार असलेल्या अजित वाडेकर यांच्या पत्नी रेखा वाडेकर सहभागी झाल्या होत्या. त्यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याचे कौतुक केले.

त्या म्हणाल्या, “मला कर्णधार म्हणून विराटपेक्षा धोनी जास्त आवडतो. तो मला अजित यांच्यासारखा वाटतो. तो त्यांच्याप्रमाणेच शांत डोक्याने अचूक निर्णय घेतो.”

विराटला दिला सल्ला
क्रिकेटची आवड व ज्ञान असणाऱ्या रेखा यांनी भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली याला एक सल्ला दिला. त्या म्हणाल्या, “अतिआक्रमकता त्याच्या खेळाला प्रभावित करू शकते. त्याने याकडे लक्ष द्यायला हवे. त्याने नियंत्रित आक्रमकता दाखवली तर, त्याच्या कामगिरीत नक्कीच आणखी सुधारणा होईल.”

भारतीय संघ सुद्धा इंग्लंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांच्या मालिकेत संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारताचे यशस्वी कर्णधार होते वाडेकर
देशांतर्गत क्रिकेट नाही मुंबईचे प्रतिनिधित्व करणारे अजित वाडेकर भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी मानले जातात. त्यांनी ३७ कसोटी मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना २,११३ धावा बनविल्या होत्या. निवृत्तीनंतर ते संघाचे प्रशिक्षक तसेच मुख्य निवडकर्ता देखील राहिले होते. त्यांचाच नेतृत्वात भारताने १९७१ साली इंग्लंडमध्ये कसोटी मालिकाविजय साजरा केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आम्हाला डिवचल्यास शांत बसणार नाही’, तिसऱ्या कसोटीपूर्वी कर्णधार कोहलीची इंग्लंडला चेतावणी

आयसीसीची ‘मोठी’ कारवाई! यावर्षी कसोटी पदार्पण करणाऱ्या ‘या’ खेळाडूच्या गोलंदाजीवर बंदी

त्यावेळी जो रूटने ‘असे’ करायला नको होते, संघसहकारी अँडरसननेच दाखवून दिली मोठी चूक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---