युवा खेळाडूंचा संघ दिल्ली कॅपिटल्सने हंगामातील साखळी फेरीच्या त्यांच्या अंतिम लढतीत विजयी शेवट केला. सोमवार (२ नोव्हेंबर) रोजी अबु धाबीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध ही रोमहर्षक लढत झाली. या लढतीत दिल्लीला ६ विकेट्सने विजय मिळवून देण्यात अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेचा मोलाचा वाटा राहिला. त्याच्या दमदार फलंदाजीला पाहून दिल्लीच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा होणे साहजिक होते. मात्र दिल्ली संघाच्या एका चिमुकल्या चाहतीने सर्वांचे लक्ष वेधले. ही चाहती इतर कोणी नसून ती रहाणेची मुलगी आर्या रहाणे आहे.
रहाणेची मुलगी झाली खुश
रहाणेची पत्नी राधिका धोपवकर हिने आर्याचे वडील रहाणेला चीयर करतानाचा व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओत आर्या दिल्ली संघाची निळ्या रंगाची जर्सी घालून दिसत आहे. तसेच टीव्हीवर वडीलांना खेळताना पाहून आनंदाने टाळ्या वाजवत आहे.
दिल्लीने या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले आहे की, ‘आमची सर्वात क्यूट चियरलीडर तिच्या पप्पांच्या शानदार खेळीने प्रभावित झाली आहे.’
Our cutest cheerleader was super impressed with Papa @ajinkyarahane88's knock last night 🤗💙#DCvRCB #Dream11IPL #YehHaiNayiDilli pic.twitter.com/KzbtC7T7HE
— Delhi Capitals (@DelhiCapitals) November 3, 2020
दिल्ली-बेंगलोर सामन्यातील रहाणेची आकडेवारी
दिल्ली-बेंगलोर संघात झालेल्या त्या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १५२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल रहाणेने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ६० धावांची अफलातून खेळी केली. ४६ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार आणि १ षटाकाराच्या मदतीने त्याने ही धावसंख्या गाठली. त्यामुळे दिल्लीने १९ षटकातच बेंगलोरचे लक्ष्य पूर्ण केले.
पहिल्या क्वलिफायर सामन्यात आहे सुवर्णसंधी
यासह दिल्लीने हंगामातील ८वा विजय नोंदवला आणि १६ गुणांची कमाई केली. त्यामुळे गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावत त्यांनी प्लेऑफच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात प्रवेश मिळवला आहे. हा सामना गुरुवारी (५ नोव्हेंबर) दुबईच्या मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होईल. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम सामन्यात पोहोचेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात अजून एक संधी मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या –
संतापजनक! कोरोना पाॅझिटीव्ह असूनही ‘तो’ क्रिकेटर उतरला मैदानावर, अन्…
रोहितच्या खांद्याला खांदा लावून गेली ११ वर्षे ‘तो’ मुंबईसाठी धावांचा रतीब घालतोय
आयपीएल २०२०: साखळी सामन्यांनंतर अशी आहे ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठीची स्पर्धाची
ट्रेंडिंग लेख-
खाकीच्या भीतीने ‘त्याची’ अशी काही टरकली की, पठ्ठ्याने भारतात येण्याचेच बंद केलं
लईच वाईट! आयपीएल २०२०मधील ७ खेळाडू; जे कधीही विसरणार नाहीत हा हंगाम
मुंबईचे ३ धडाकेबाज खेळाडू, ज्यांना पुढील हंगामात केले पाहिजे रिलीझ