भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिका बुधवारी (12 जुलै) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना डॉमिनिकामध्ये खेळला जात आहे. पहिल्या दिवशी वेस्ट इंडीज संघ स्वस्तात बाद झाला आणि भारतासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) ही सलामीवीर जोडी फलंदाजीला आली. गिल या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळणार असून त्याने स्वतःच हा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने खास प्रतिक्रिया दिली.
आकाश चोप्रा (Akash Chopra) आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “शुबमन गिल (Shumban Gill) याने संघ व्यवस्थापनाकडे तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची इच्छा व्यक्त केली. हे खूपच आश्चर्यचकीत करणारे आहे. कारण आपण भारतीय क्रिकेटमध्ये शक्यतो अशा गोष्टी होताना पाहिल्या नाहीत. आपण एकाद्या खेळाडूल संघ व्यवस्थापनाला असे बोलताना पाहिलेच नाहीये की, मला एकाद्या विशेष स्थानावर फलंदाजी करायला आवडते. अशी मागणीही कोणी करत नाही आणि त्याला अशा पद्धतीनेच महत्वही दिले जात नाही. पण चांगली गोष्ट आहे की, यशस्वी जयस्वाल सलामीला खेळू शकेल.”
आकाश चोप्रा पुढे असेही म्हटला की, गिल भविष्यात सलामीऐवजी मधल्या क्रमांकावर खेळमार, याची कल्पना आधीच होती. त्याने यासंबंधीचे ट्वीट 2020 मध्येच केले होते, असे तो म्हणाला. “शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळणार, यामुळे जरही आश्चर्य वाटत नाहीये. मी 2020मध्येच ट्वीट केले होते की, तो भारतासाठी दीर्घकाळ खेळणार आहे आणि येत्या काही वर्षांमध्ये तुम्ही त्याला मधल्या फळीत खेळताना पाहू शकता. आता त्याने स्वतःच अशी इच्छा व्यक्त केली आहे,” असे चोप्रा पुढे म्हणाला.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम गोलंदाजी करावी लागली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीज संघ अवघ्या 150 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरत पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने एकही विकेट न गमावता 80 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा (30*) आणि यशस्वी जयस्वाल (40*) दिवसाखेर नाबाद राहिले. तत्पूर्वी रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने विकेट्सचे पंचक घेतल विरोधी संघाला स्वस्तात गुंडाळण्यासाठी मदत केली. (Akash Chopra expressed surprise as Shubman Gill himself decided to play at number three)
महत्वाच्या बातम्या –
‘डब्ल्यूटीसी फायनलसाठीही मी पूर्ण तयार होतो…’, विकेट्सचे पंचक घेतल्यानंतर अश्विनने व्यक्त केली खंत
‘आम्ही त्याच्यासाठी संघातील वातावरण…’, युवा पदार्पणवीराबद्दल अश्विनचं मोठं भाष्य