भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राची (Aakash Chopra) गणना सर्वोत्तम हिंदी समालोचकांमध्ये केली जाते. आकाश चोप्राची समालोचन करण्याची शैली क्रिकेट चाहत्यांना खूप आवडते. तो टीव्हीवर कॉमेंट्रीशिवाय सोशल मीडिया यूट्यूबवरूनही भरपूर कमाई करतो. त्याला अलीकडेच एका पॉडकास्टसाठी आमंत्रित करण्यात आले होते, जिथे त्याने एका समालोचकाच्या कमाईबद्दल मोठा खुलासा केला. या बातमीद्वारे आपण तो काय म्हणाला हे जाणून घेऊया.
अनुभवी समालोचकाच्या तुलनेत ज्युनियर समालोचकाला किती पगार मिळतो असे आकाश चोप्राला विचारले असता, त्याने उत्तर दिले की, समालोचकांना प्रत्येक सामन्याच्या आधारावर किंवा वेगळ्या आधारावर वेतन दिले जाते. कनिष्ठ समालोचक दिवसाला 35-40 हजार रुपये कमावतात, तर अनुभवी समालोचक एका दिवसाच्या समालोचनासाठी 10 लाख रुपये कमावतात.
माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा एका पॉडकास्टमध्ये म्हणाला, “भारतातील क्रिकेट समालोचक दररोज 6 ते 10 लाख रुपये कमावतात. जर एखाद्या समालोचकाने वर्षातून सरासरी 100 दिवस कॉमेंट्री केली तर त्याची वार्षिक कमाई 10 कोटी रुपयांपर्यंत होते.”
आकाश चोप्राच्या (Aakash Chopra) आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 10 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 23च्या सरासरीने 437 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 34.60 राहिला आहे. कसोटीमध्ये त्याच्या नावावर 2 अर्धशतके आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“धोनी नॉनव्हेज खायचा, पण माझ्यासाठी त्याने महिनाभर शाकाहारी जेवण खाल्ले”, जुन्या रूममेटचा खुलासा
श्रेयस अय्यरच्या संघाचा सलग दुसरा पराभव, आयपीएल विजेता कर्णधार फलंदाजीतही फ्लॉप!
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स गेणारे टाॅप-5 गोलंदाज