---Advertisement---

आकाश चोप्रा यांनी केली मोठी भविष्यवाणी, सांगितले कोणत्या परदेशी खेळाडूंवर लागणार सर्वाधिक बोली!

On: गुरूवार, डिसेंबर 11, 2025 6:58 PM
---Advertisement---

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही महिने शिल्लक आहेत. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावात काही स्टार खेळाडूंवर मोठी बोली लागू शकते. सर्व संघांनी आपल्या संघात हवे असलेल्या खेळाडूंना प्रमुख रिटेन केलं आहे. तर इतर खेळाडूंना रिलीज केलं आहे. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने आगामी आयपीएल स्पर्धेच्या लिलावात कोणत्या खेळाडूवर मोठी बोली लागू शकते याबाबत आपलं मत मांडलं आहे.

आकाश चोप्राने सर्वाधिक बोली लागणाऱ्या 5 परदेशी खेळाडूंची नावं सांगितली आहेत. ज्यात दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर आणि वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया यांचा समावेश आहे. तर श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथीरानाला त्याने या यादीत तिसरे स्थान दिले आहे. आकाश चोप्रा म्हणाला, “आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका सुरू आहे. मी डेव्हिड मिलर, एनरिक नॉर्खिया आणि मथीशा पथीरानाला पाचव्या स्थानी ठेवलं आहे. जर डेव्हिड मिलर आणि एनरिक नॉर्खिया हे दोघेही भारतीय संघाविरुद्ध दमदार कामगिरी करतील, तर दोघांवरही मोठी बोली लागू शकते.

तसेच त्याने फिरकी गोलंदाजी करणारे अष्टपैलू खेळाडू कुपर कॉनोली आणि मायकल ब्रेसवेल यांना चौथ्या स्थानी ठेवलं आहे. आकाश चोप्रा म्हणाला, “चेन्नई सुपर किंग्ज संघाला एका ऑफ स्पिनरची गरज आहे. मायकल ब्रेसवेल फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. त्यामुळे चेन्नईने त्याचा विचार करावा. तर रिकी पाँटिंगकडे एक परदेशी खेळाडू घेण्याची संधी आहे. त्यामुळे ते कॉनोलीचा विचार करू शकतात.”

तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या खेळाडूंबाबत बोलताना तो म्हणाला, “लियाम लिव्हिंगस्टोनने पंजाब किंवा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी हवी तशी कामगिरी केलेली नाही. पण मला तरी वाटतं की, तो मोठी रक्कम कमावू शकतो.” दुसऱ्या स्थानी त्याने जॉनी बेअरस्टोला ठेवलं आहे. बेअरस्टोबाबत बोलताना तो म्हणाला, “मी जॉनी बेअरस्टोला दुसऱ्या स्थानी ठेवलं आहे. कारण त्याने खूप धावा केल्या आहेत. त्याला गेल्या हंगामात मुंबई इंडियन्स संघासाठी काही सामने खेळण्याची संधी देखील मिळाली आहे. त्यामुळे त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.”

तसेच कॅमरून ग्रीनला त्याने पहिल्या स्थानी ठेवलं आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला, “कॅमरून ग्रीन नंबर 1 स्थानी असेल. इतर कोणी त्याच्या आसपासही नाही. अंतिम किंमत कितीही असूद्या, त्याला 18 कोटी मिळणार. त्याला संघात घेण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळू शकते.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---