भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याने बॉक्सिंग डे कसोटीत पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील या सामन्यात केएल राहुलने भारतासाठी शतकी खेळी केली. त्याच्या शतकामुळे प्रथम फलंदाजी करताना भारताने 245 धावांपर्यंत कशीबशी मजल मारली. मागच्या मोठ्या काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये अपेक्षित कामगिरी न केलेल्या राहुलसाही हे शतक महत्वाचे होते. अशातच भारताचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्रा याची खास प्रतिक्रिया समोर येत आहेत.
केएल राहुल (KL Rahul) सेंच्युरियनमध्ये 2023 मधील आपला अवघा तिसरा कसोटी सामना खेळत आहे. बॉस्किंग डे कसोटीत राहुल संघासाठी हिरो ठरला. भारतीय संघाचे फलंदाज एकापाठोपाठ विकेट्स गमावत असताना राहुलने मात्र संयमी खेळी केली. 137 चेंडूत 101 धावा केल्यानंतर राहुल भारतीय संघाची 10वी विकेट ठरला. संघातील दुसऱ्या एकही फलंदाजा या डावात अर्धसतक करता आले नाही. गरजेच्या वेळी या सामन्यात राहुल खंबीरपणे उभा राहिला. पण मागच्या मोठ्या काळापासून याच राहुलवर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली. आकाश चोप्रा (Aakash Chopra) यानेही हा मुद्दा बोलून दाखवला.
आपल्या युट्यूब चॅनलवर केएल राहुल म्हणाला, “भारतीय संघ अजूनही सामन्यात आहे. माझ्या मते 8 विकेट्सच्या नुकसानावर 208 धावा (पहिल्या दिवसाखेर) ही चांगली धावसंख्या आहे. सामना अजूनही बरोबरीचा आहे. काहींचं म्हणणं आहे की, राहुल खेळलेच नाही पाहिजे. कारण त्याला चांगेल प्रदर्शन करता येत नाहीये आणि त्याला खूप संधी मिळाल्या आहेत. राहुलने इंग्लंडमध्ये धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये धावा केल्या आहेत. म्हणजेच त्याने प्रत्येक ठिकाणी धावा केल्या आहेत. पण तरीही त्याच्यावर प्रश्न उपस्थित होत राहिले आहेत.”
सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आकाश चोप्रा याने ही प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्या दिवशीच्या खेळात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे अवघ्या 59 षटकांचा खेळ झाला. दुसऱ्या दिवशी राहुल आणि मोहम्मद सिराज यांनी भारतासाठी डावाची सुरुवात केली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात भारतीय संघ 245 धावा करून सर्वबाद झाला. (Aakash Chopra said that despite KL Rahul scoring runs, he gets criticized)
पहिल्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर, एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
महत्वाच्या बातम्या –
कमिन्सची भेदक गोलंदाजी अन् उडाला बाबरचा त्रिफळा, माजी कर्णधाराने फक्त 1 धावेवर पकडला तंबूचा रस्ता- Video
नाद नाद नादच! संघ अडचणीत असताना KL राहुलची क्लास Century, गगनचुंबी षटकाराने ठोकलं शतक