आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला सात सामन्यांपैकी चार सामन्यात विजय मिळवून देणारा कर्णधार दिनेश कार्तिकने शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ऑयन मॉर्गनने केकेआरचे नेतृत्व केले.
कार्तिकने म्हटले होते की, फलंदाजीवर अधिक लक्ष देण्यासाठी कर्णधारपद सोडले आहे. असे असले तरीही ही गोष्ट क्रिकेटप्रेमींपासून ते क्रिकेटतज्ज्ञांपर्यंत कुणालाच पचलेली दिसत नाही. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने त्याचे मत मांडत म्हटले आहे की, कार्तिकने स्वत: कर्णधारपद सोडलेले नाही तर, केकेआरने त्याला कर्णधारपदावरुन काढून टाकले आहे.
कर्णधारपद स्वखुशीने नाही सोडले, तर केकेआरने टाकले काढून
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना चोप्रा म्हणाला की, “केकेआरने हंगामाच्या मध्यातरांनंतर कार्तिकला कर्णधारपदावरुन काढून टाकले आहे. तरीही संघ नेहमी असेच म्हणणार की, कार्तिक स्वखुशीने कर्णधारपद सोडले आहे. कारण माझ्या मते तर, कोणताही कर्णधार त्याच्या संघाला असं अर्ध्यात सोडण्याचा विचार करत नाही.”
कार्तिकच्या नेतृत्त्वाखाली संघ करत होता चांगले प्रदर्शन
पुढे बोलताना चोप्रा म्हणाला की, “या हंगामात कार्तिकच्या नेतृत्त्वाखाली संघ चांगले प्रदर्शन करत होता. त्याने आपल्या नेतृत्त्वाखाली केकेआरला ७ सामन्यांपैकी ४ सामने जिंकून दिले होते. त्यामुळे पुढे त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी उर्वरित ७ सामन्यांतील ४ सामने जिंकायची गरज होती.”
“कार्तिकच्या फलंदाजीविषयी बोलायचं तर, त्याने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध अर्धशतकीय खेळी केली होती, तीही खूप कमी चेंडूत. एवढ्या चांगल्या स्थितीत असतानाही त्याने कर्णधारपदाचा राजीनामा का दिला, हे मला समजले नाही. जर केकेआरला मॉर्गनला कर्णधार बनवायचे होतेच, तर त्यांनी त्याला हंगामाच्या सुरुवातीलाच का बनवले नाही. जर तुम्ही हंगामाच्या अर्ध्यातच असा निर्णय घेत असाल तर, सर्व गोष्टी बिघडतात,” असे शेवटी चोप्राने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
एकच नंबर भावा! राहुल तेवतियाच्या अँकल ट्विस्टने कोहलीच्या ‘विराट’ शॉटला अडवलं
‘मिस्टर ३६०’ ठरला आरसीबीचा संकटमोचक, ७ विकेट्सने राजस्थानला लोळवलं
कटू सत्य! स्वत: राजस्थान संघच ठरतोय त्यांच्या स्टार खेळाडूंच्या फ्लॉप होण्यामागचं कारण
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…