शुक्रवारी (९ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीग २०२०चा २३वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात दिल्लीने राजस्थानला ४६ धावांनी पराभूत केले. युवा खेळाडू यशस्वी जैस्वालने राजस्थानकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने सलामीला फलंदाजीसाठी येत ३६ चेंडूत सर्वाधिक ३४ धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांनी लवकरच विकेट्स गमावल्यामुळे तो संघाला सामना जिंकून देऊ शकला नाही.
त्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर यशस्वी जैस्वालच्या फलंदाजी शैलीवर खूप टीका केली. मात्र भारतीय समालोचक आकाश चोप्रा त्याच्या ट्रोलर्सवर चांगलाच संतापला.
१९ वर्षांखालील भारतीय विश्वचषकाचा स्टार खेळाडू यशस्वी जैस्वालला त्याचे खाते उघडण्यासाठी थोडा वेळ लागला. त्यामुळे काही चाहत्यांनी त्याच्या संथ गतीने केलेल्या फलंदाजीची थट्टा केली. यानंतर चोप्राने ट्विट करत लिहिले की, “१९ वर्षीय क्रिकेटपटूची थट्टा करण्यापुर्वी तुम्ही स्वत:ला पाहा. जेव्हा तुम्ही १९ वर्षांचे होता तेव्हा तुम्ही काय करत होता. ज्या युवा खेळाडूची तुम्ही मजा घेताय, त्याने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. त्यावेळी विश्वचषकात तो मालिकावीर राहिला होता. अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने द्विशतकही केले आहे.”
Before mocking a 19yo cricketer, please ask yourself—what were you doing when you were 19? The kid you’re making fun of has already represented India at U-19 level, was Man of the Tournament at the World Cup & has scored a double-century in List-A cricket for Mumbai #YashasviBhav
— Aakash Chopra (@cricketaakash) October 9, 2020
महत्त्वाचे म्हणजे, ज्यावेळी यशस्वी जैस्वाल १९ वर्षांखालील भारतीय विश्वचषक संघाचा भाग होता, त्यावेळी त्याचे वय केवळ १८ वर्षे इतके होते. तसेच, त्याने पूर्ण चषकात सर्वाधिक ४०० धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
आशिया खंडात कुणालाही न करता आलेला विक्रम आता शोएब मलिकच्या नावावर
कट्टर प्रतिस्पर्धी असलेले ‘हे’ खेळाडू गाजवतायत मैदान; म्हणे, एकमेकांसोबत खेळताना वाटतो आनंद
IPL 2020: चेन्नई विरुद्ध बेंगलोर सामन्यात धोनी, कोहलीसह ‘हे’ खेळाडू करु शकतात खास विक्रम
ट्रेंडिंग लेख-
जो नडला त्याला तिथेच धुतला.! सहा टाके पडूनही मैदानावर परतत खेळाडूने गोलंदाजाची केली मनसोक्त धुलाई
शेन वॉर्नच्या ‘त्या’ चेंडूला रिची बेनो यांनीच म्हटले होते शतकातील सर्वोत्तम चेंडू
शतकी खेळी करणाऱ्या भारतीय खेळाडूला ‘त्यांनी’ चक्क घेतले होते उचलून