भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका रंगात आली आहे. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांनंतर भारतीय संघ 2-1 अशा आघाडीवर आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाकडून ही मालिका सुरू झाल्यापासून तीन खेळाडूंना कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. आता चौथ्या कसोटी सामन्याआधी अशी माहिती येत आहे की, अजून एक केखाडू भारतासाठी कसोटी पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतासाठी एकाही खेळाडूने पदार्पण केले नव्हते. पण मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रजत पाटीदार याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांनीही कसोटी पदार्पण केले. आता चौथ्या सामन्यात बंगाल क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज आकाश दीप कसोटी पदार्पण करू शकतो.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारी रोजी रांचीमध्ये सुरू होईल. आकाश दीपला या सामन्यात पदार्पणाची संधी मिळण्याचे दोन प्रमुख कारण आहेत. पहिले कारण म्हणझ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह () याला विश्रांती दिली गेली. तसेच एकटा मोहम्मद सिराज सोडला तर संघातील सर्व वेगवान गोलंदाज अपेक्षित प्रदर्शन करताना दिसत नाहीत. मुकेश कुमार याने दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजी केली, पण तो आपला प्रभाव पाडू शकला नाही. याच पार्श्वभूमीवर आकाश दीपसाठी भारतीय कसोटी संघाचे दरवाचे खुले होऊ शकतात. प्रश्रण श्रेणी क्रिकेटमध्ये आकाशचा मोठा अनुभव आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 30 रणजी सामन्यांमध्ये 104 विकेट्स घेतल्या आहेत.
माध्यमांतील वृत्तांनुसार बुमराहला विश्रांती दिल्यानंतर आकाश दीप त्याचा बदली खेळाडू म्हणून त्याला खेळू शकतो. भारत अ संघासाठी नुकत्याच खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली. इंग्लंड लायंस संघासोबतच्या या तीन सामन्यांमध्ये मिळून आकाशने 13 विकेट्स नावावर केल्या. भारतीय संघाची गरज पाहता मुकेश कुमार हा वेगवान गोलंदाजीचा पर्यात आहे. पण मुकेशचा फॉर्म बिघडल्याचे मागच्या काही सामन्यांमधून समजते. मुकेशने भारतासाठी आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत. अशात भारताच्या आगामी सामन्यात आकाश दीप प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसण्याची पूर्ण शक्यता आहे. (Akash Deep may get a chance to make his Test debut in Ranchi)
महत्वाच्या बातम्या –
श्रेयस अय्यर आयपीएलला मुकणार? केकेआरला सलग दुसऱ्या वर्षी बसू शकतो मोठा झटका
IPL 2024आधी आंद्रे रसेलचे तुफान! बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ठोकल्या 12 चेंडूत नाबाद 43 धावा