---Advertisement---

IND vs ENG: सिराज, आकाशदीप अपयशी, नीतीश कुमार रेड्डीची शानदार कामगिरी!

On: गुरूवार, जुलै 10, 2025 8:35 PM
---Advertisement---

बर्मिंघम कसोटी सामन्यात शानदार गोलंदाजी करणाऱ्या आकाशदीप (Aakshdeep & mohmmed Siraj) आणि मोहम्मद सिराजकडून तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार शुबमन गिलला (Shubman gill) मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र लॉर्ड्स कसोटी सामन्यात या दोन्ही गोलंदाजांनी आत्तापर्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. याच काळात अष्टपैलू खेळाडू नीतीश कुमार रेड्डीने (Nitish Kumar Reddy) सर्वाधिक छाप पाडली आहे. रेड्डीनेच इंग्लंडच्या दोन्ही सलामी फलंदाजांना माघारी पाठवले. बुमराहविरुद्ध इंग्लंडचे फलंदाज फारच सावधगिरीने खेळत आहेत.

एजबेस्टन कसोटी मधील दोन्ही डावांत आकाशदीप आणि मोहम्मद सिराज यांनी नवीन चेंडूने विकेट घेतल्या होत्या. त्याचमुळेच टीम इंडियाने (Team india) तिथे शानदार विजय मिळवला होता. पण हे दोन्ही गोलंदाज मागील सामन्यातील फॉर्म कायम ठेवण्यात अपयशी ठरले. त्यामुळेच इंग्लंडच्या संघाने फक्त 2 विकेट गमावून 110 धावा केल्या आहेत. सध्या ओली पोप आणि जो रूट मैदानावर टिकून खेळत आहेत. टीम इंडियाला पहिल्याच दिवशी भक्कम स्थितीत पोहोचण्यासाठी आणखी विकेट्स घ्याव्या लागतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---