---Advertisement---

आकाशदीपचा गौतम गंभीरविषयी खास खुलासा, जाणून घ्या नेमके काय म्हणाला?

On: बुधवार, ऑगस्ट 13, 2025 8:16 PM
---Advertisement---

भारत-इंग्लंड (IND vs ENG) 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-2 अशी बरोबरी झाली. या मालिकेत पहिला आणि तिसरा कसोटी सामना इंग्लंडने जिंकला, तर दुसरा आणि पाचवा कसोटी सामना भारताने जिंकला. चौथा सामना ड्रॉ झाला. भारताला मिळालेल्या दोन्ही विजयांमध्ये अष्टपैलू खेळाडू आकाशदीपचा (Aakash Deep) मोलाचा वाटा होता. या मालिकेनंतर भारतीय वेगवान गोलंदाजाने हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्याबद्दल चकित करणारा खुलासा केला आहे.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत आकाशदीप म्हणाला, मी स्वतःवर जितका विश्वास ठेवतो, त्याहून जास्त गौतम सर माझ्यावर विश्वास ठेवतात. आकाशदीपच्या सांगण्यानुसार, कोच गंभीर यांनी त्याला सांगितले होते, तुला अजून स्वतःची ताकद कळलेली नाही. बघ, मी सांगतोय तू हे करू शकतोस. तुला नेहमीच या जिद्दीने खेळायला हवं.

आकाशदीपने पुढे सांगितले, गौतम भाऊ अतिशय जिद्दी कोच आहेत. ते नेहमी आम्हाला प्रेरित करतात. माझ्यावर ते माझ्यापेक्षाही जास्त विश्वास ठेवतात. माझ्या फलंदाजीवर आणि गोलंदाजीवर त्यांचा सारखाच विश्वास आहे.

लीड्समध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये आकाशदीपला संधी मिळाली नाही. पण बर्मिंगहॅममध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संघात त्याचा समावेश होताच, त्याने स्वतःला सिद्ध करण्याची संधी दवडली नाही. या सामन्यातील दोन्ही डाव मिळून त्याने 10 विकेट्स घेतल्या. ज्यात त्याच्या कारकिर्दीतील पहिला पाच विकेट्सचा पराक्रमही होता.

केनिंग्टन ओव्हल येथे झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात आकाशदीपने फलंदाजीमध्येही चमक दाखवली. भारताच्या दुसऱ्या डावात नाईट वॉचमन म्हणून उतरून त्याने महत्त्वाची खेळी साकारली. 94 चेंडूत 66 धावांची दमदार खेळी करताना त्याने 12 चौकार लगावले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---