अभिनेता-निर्माता अक्षय कुमारने गोल्डनंतर अॅथलेटिक्स हिमा दासवर चरित्रपट बनवण्यास आवडेल असे म्हटले आहे. वयाच्या 18व्या वर्षीच सुवर्ण पदक जिंकणारी हिमा दास ही पहिलीच भारतीय अथलेटिक्स ठरली.
फिनलॅंड येथे नुकतेच आईएएएफ 20 वर्षाखालील जागतिक एथलॅटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने सुवर्ण पदकाची कामगिरी करत हा इतिहास घडविला. हिमाने महिलांच्या 400 मीटर अंतिम शर्यतीत 51.46 सेकंदात अव्वल स्थान पटकावत सुवर्ण पदक जिंकले.
इंडोनेशियातील एशियन गेम्समध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी एडलवाइज ग्रुपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तो बोलत होता.
“एखाद्या विशिष्ट भागातून येऊन भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणे ही खूप मोठी बाब आहे”,असे अक्षय कुमारने म्हटले आहे.
“अथलेटिक्समध्ये भारताची तेवढी चांगली कामगिरी नाही. मला जगाला दाखवून द्यायचे आहे की भारतातही चांगली खेळाडू आहेत जे लांबून येऊन उत्तम कामगिरी करतात. म्हणूनच मला तिच्यावर चरित्रपट बनवण्यास नक्की आवडेल.”
गोल्ड हा चित्रपट 1936च्या ऑलिंपिकमधील भारताच्या हॉकी संघाने केलेल्या सुवर्ण पदकाच्या कामगिरीवर बेतलेला आहे. हे भारताचे ऑलिंपिकचे पहिलेच सुवर्ण पदक ठरले.
यामध्ये अक्षय कुमार हा हॉकीचे तरूण सहाय्यक व्यवस्थापक तपन दास यांची भुमिका साकारत आहे. त्यांनी 1936च्या या कालावधीत भारत म्हणून एक स्वतंत्र संघ म्हणून खेळण्यास कशाप्रकारे लढा दिला हे दाखवले आहे.
यामध्ये अक्षय बरोबरच अमित साद, कुणाल कपूर, सनी कौशल आदी कलाकार असून हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–टाॅप ५- इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे ५ भारतीय गोलंदाज
–टीम इंडियातील ‘तिल्ली’ हे प्रकरण तुम्हाला माहीत आहे का?