हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar) याला क्रिकेटविषयी खूप आवड आहे. अक्षय अनेकदा भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी सामन्यादरम्यान मैदानात दिसला आहे. मागच्या महिन्यात पार पडलेल्या टी२० विश्वचषकादरम्यान देखील तो स्टेडियमवर भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आला होता. अक्षयला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक सामन्यादिवशी मैदानावर पाहिले गेले आहे. आता अक्षयने भारतीय संघातील आवडत्या दोन खेळाडूंची नावे सांगितली आहेत.
सध्या विराट कोहली (virat kohli) कडून भारताच्या एकदिवसीय संघाचे कर्णधापद काढून घेऊन रोहित शर्मा (rohit sharma) याच्याकडे ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अशात या दोन खेळाडूंची सर्वत्र चर्चा होत आहे. या सर्व घडामोडींमध्ये अक्षय कुमारने मात्र त्याच्या दोन आवडत्या क्रिकेटपटूंची नावे सांगताना या दोघांपैकी एकाचेही नाव घेतले नाही. अक्षयला त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूविषयी विचारले गेले असता, त्याने भारताचा सध्याचा सलामीवीर केएल राहुल (kl rahul) आणि दिग्गज शिखर धवन (shikhar dhawan) या दोघांची नावे घेतली. तसेच माजी खेळाडूंपैकी बीएस चंद्रशेखर (bs chandrasekhar) यांना त्याचे आवडते क्रिकेटपटू सांगितले आहे.
शिखर धवनची संपूर्ण कारकीर्द –
शिखर धवनने भारतासाठी खेळलेल्या ३४ कसोटी सामन्यांमधील ५८ डावांत २३१५ धावा केल्या आहेत आणि यामध्ये तो एकदा नाबाद राहिला आहे. यादरम्यान त्याने ७ शतक आणि ५ अर्धशतके ठोकले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने १४५ सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि यामध्ये ६१०५ धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटच्या कारकिर्दीत त्याने ८ वेळा नाबाद खेळी केली आहे. यात १७ शतक आणि ३३ अर्धशतके देखील केली आहेत. टी२० मध्ये ६८ सामन्यात त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि यामध्ये १० अर्धशतकांच्या मदतीने १७५९ धावा केल्या. सध्या धवन मागच्या काही महिन्यांपासून संघातून बाहेर आहे.
केएल राहुलची संपूर्ण कारकीर्द –
केएल राहुलने आतापर्यंत खेळलेल्या ३८ वनडे सामन्यांमध्ये ६ वेळा नाबाद खेळ्या करत १५०९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ५ शतक आणि ९ अर्धशतके ठोकली आहेत. तसेच खेळलेल्या ४० कसोटी सामन्यांमध्ये ६ शतक आणि १२ अर्धशतकाच्या मदतीने २३२१ धावा केल्या आहेत. टी२० मध्ये त्याने ५६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि २ षटक आणि १६ अर्धशतकांसह १८३१ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
‘महाराष्ट्राची नंबर १ डीश’ म्हणत सचिन तेंडुलकरने मिसळ पाववर मारला ताव, व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! क्रिकेट क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव, बांगलादेशच्या २ क्रिकेटर आढळल्या पॉझिटिव्ह
हेजलवूड चाहत्याच्या फिरकीवर बोल्ड! चक्क चूक झाल्याच्या कबुलनाम्यावर केली स्वाक्षरी