जगभरात सध्या कोविड-१९ चा नवा व्हेरिएंट ओमीक्रॉनने खळबळ माजवली आहे. दक्षिण आफ्रिकेत या व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर इतर देशही सतर्क झाले आहेत. यानंतर आता क्रिकेट क्षेत्रातही या महामारीचा शिरकाव झाला असल्याचे धक्कादायक वृत्त पुढे आले आहे. बांगलादेश संघाच्या २ महिला क्रिकेटपटूंना (Bangladesh Women Cricketers) ओमीक्रॉन (Omicron Variant)चे संक्रमण झाले आहे. झिम्बाब्वेवरुन स्वदेशी परतल्यानंतर त्या ओमीक्रॉन संक्रमित आढळल्या आहेत. बांगलादेशचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जाहिद मलिक यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.
बांगलादेशचा महिला क्रिकेट संघ, आयसीसी महिला विश्वचषक २०२२ च्या पात्रता फेरी (ICC Women World Cup Qualifiers 2022) सामन्यांसाठी झिम्बाब्वेला गेला होता. हे सामने झाल्यानंतर महिला क्रिकेटपटू नुकत्याच ६ डिसेंबर रोजी मायदेशी परतल्या होत्या. तत्पूर्वी १ डिसेंबर रोजी ढाका येथे आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. याचे निकाल २ दिवसांनंतर आले होते, ज्यामध्ये सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आढळले होते. परंतु दुर्दैवाने ६ डिसेंबरला २ महिला खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.
यानंतर कोरोनाच्या नियमांमुसार, त्यांना काही काळ विलगीकरणात ठेवण्यात आले होते. परंतु स्वदेशी येताच संघातील २ सदस्यांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळल्याने पूर्ण संघाचा विलगीकरण कालावधी वाढवण्यात आला होता.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या महिला विंगचे अध्यक्ष नादेल चौधरी यांनी या गोष्टीची पृष्टी केली आहे. “बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघाचा विलगीकरणाचा कालावधी ६ डिसेंबर रोजी संपणार होता. परंतु पुढे त्यांचा अनिवार्य विलगीकरण कालावधी वाढवून १४ दिवसांवर नेण्यात आला आहे,” असे ते म्हणाले.
तसेच याविषयी बोलताना बांगलादेशचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जाहिद मलिक यांनी सांगितले की, “ओमीक्रॉनची लागण झालेल्या २ महिला क्रिकेटपटूंना बरे होण्यास थोडा वेळ लागेल. कोरोना नियमांनुसार, आम्ही त्यांना २ आठवड्यांसाठी देखरेखीखाली ठेवणार आहोत. त्यानंतर पुढे त्या पूर्णपणे बऱ्या झाल्यावर त्यांना घरी पाठवले जाईल. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा आम्ही शोध घेत आहोत. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीने पहिल्याच भेटीत अनुष्काला मारला होता टोमणा, स्वतःच केला मोठा खुलासा
भारी ना! कर्णधार म्हणून पदार्पणातच पॅट कमिन्सने मोडला ६३ वर्षांपूर्वीचा विक्रम