ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ऐतिहासिक ऍशेस मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून आपल्या नावावर करत, मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. दरम्यान या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या पॅट कमिन्सच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
कसोटी संघाचा कर्णधार म्हणून हा पॅट कमिन्सचा पहिलाच सामना होता. या सामन्यात त्याने गोलंदाजीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात ३८ धावा खर्च करत ५ गडी बाद केले होते, तर दुसऱ्या डावात त्याने २ गडी बाद केले. त्याने संपूर्ण सामन्यात ८९ धावा खर्च करत ७ गडी बाद केले. यासह त्याने ६३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे.
कुठल्याही ऑस्ट्रेलियन कर्णधाराने आपल्या पहिल्याच सामन्यात केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी रीची बेनॉड यांच्या नावावर हा विक्रम होता. त्यांनी कर्णधार म्हणून त्यांच्या पहिल्या सामन्यात ११२ धावा खर्च करत ७ गडी बाद केले होते. हा कारनामा त्यांनी १९५८ मध्ये केला होता. त्यानंतर केवळ पॅट कमिन्सने हा विक्रम आता मोडला आहे.
पॅट कमिन्सने पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच डावात ५ गडी बाद केले होते. तो ऍशेस मालिकेतील पहिल्याच सामन्यात ५ गडी बाद करणारा दुसराच कर्णधार ठरला होता. यापूर्वी १९८२ मध्ये माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार बॉब विलीसने कर्णधार म्हणून पहिल्या डावात ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता.
तसेच सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर हा सामना इंग्लंड संघाने ९ गडी राखून आपल्या नावावर केला आहे. यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी (११ डिसेंबर) इंग्लंड संघाचा डाव २९७ धावांवर संपुष्टात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवण्यासाठी २० धावांची आवश्यकता होती.
महत्वाच्या बातम्या:
अबब! ३९९ ते ४०० कसोटी विकेट्सपर्यंतचा प्रवास करण्यासाठी नेथन लायनला लागले तब्बल ३२६ दिवस
“२०१४ च्या इंग्लंड दौऱ्यानंतर विराट खचलेला”; माजी प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा
पाकिस्तानकडून मिळालेल्या पराभवाचा बदला घेण्याची ‘टीम इंडिया’ला संधी, ‘या’ तारखेला होणार सामना